पुण्यात आणखी एक गवा, पण येतायत कुठून?

या गव्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याचे आव्हान देखील प्रशासनासमोर आहे.

पुण्यात आणखी एक गवा, पण येतायत कुठून?
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 1:17 PM

पुणे : पुणे येथे पुन्हा एकदा रानगवा आल्याने मोठी खळबळ उडाली आहे (Bison Found Again In Pune Bavdhan). 13 दिवसांपूर्वीच 9 डिसेंबरला कोथरुड परिसरात आलेल्या गव्याला रेस्क्यू करताना उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त केली गेली होती (Bison Found Again In Pune Bavdhan).

त्यानंतर आज पुन्हा पुण्यात गवा आल्यानंतर प्रशासनाची आणि रेस्क्यू टीमची मोठी त्रेधातिरपीट उडालेली आहे. या गव्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याचे आव्हान देखील प्रशासनासमोर आहे. पण, हे रानगवे येतायत कुठून हा प्रश्न सध्या प्रशासनासमोर आहे.

पुण्याच्या बावधन येथील हायवेलगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे जंगलात हा गवा आलेला आहे. त्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. सध्या या गव्याला रेस्क्यू करण्याचे काम चालू असून घटनास्थळी स्थानिक नगरसेवक किरण दगडे पाटील हेदेखील बारकाईने लक्ष ठेवून उपस्थित आहेत.

रेस्क्यू ऑपरेशनसाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे, त्यामुळे कृपया येथे कोणीही गर्दी करु नये, असं कळकळीचे आवाहन नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केलं आहे (Bison Found Again In Pune Bavdhan).

पुणेकरांच्या हुल्लडबाजीमुळे रानगव्याचा मृत्यू

बुधवारी (9 डिसेंबर) सकाळी आठच्या सुमारास जखमी रानगवा कोथरूडच्या महात्मा सोसायटीच्या परिसरात आला. पहाटे फिरण्यासाठी आलेल्या लोकांनी हा प्राणी पाहिला. त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी अग्निशमन दल, पोलीस आणि वन खात्याला त्याची माहिती दिली. त्यामुळे या विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याची माहिती पुणेकरांना कळताच पुणेकरांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी केली. लोकांची गर्दी वाढल्याने हा रानगवा बिथरला. यातच रानगव्याचा मृत्यू झाला.

सातशे ते आठशे किलो वजन

हा गवा अत्यंत शक्तिशाली होता. तब्बल 700 ते 800 किलो वजनाचा हा गवा होता. जंगलात राहणारा हा महाकाय प्राणी बुधवारी पुण्यात आल्याने नागरिकांची या गव्याला पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.

पुण्यात कोथरुडसारख्या दाटीवाटीच्या भागात रानगवा आढल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला होता. त्याला पाहण्यासाठी पुणेकरांनी या परिसरात मोठी गर्दी केली होती. ही गर्दी बघून रानगवा बिथरला. नंतर वनविभाने या रानगव्याला पकडलं. मात्र, काही वेळांनतर त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पुण्यात रानगवा आढल्याची बातमी काही क्षणांत महाराष्ट्रभर पसरली. सोशल मीडियावर रानगव्याचे काही व्हिडीओही व्हायरल झाले. तर, काही पुणेकरांच्या हुल्लडबाजीमुळे रानगव्याला आपला प्राण गमवावा लागल्याचा आरोप काही प्राणीप्रेमींनी केला.

मात्र, त्यानंतर गुरुवारी (10 डिसेंबर) पुण्यात गव्याची माफी मागणारे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच, त्यांनी रानगव्याची प्रतिकृतीही उभारली आहे.

Bison Found Again In Pune Bavdhan

संबंधित बातम्या :

कोथरुडच्या सोसायटीत शिरला रानटी गवा, पुणेकरांची गर्दी

मानवी वस्तीत आलेल्या रानगव्याचा पुणेकरांच्या हुल्लडबाजीने घेतला जीव; पुण्यात सहा तासांचा थरार!

‘मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबलाही माणुसकीने वागवलं पण पुणेकरांनी रानगव्यास मारुन दाखवलं!’

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.