Pune BJP : पुण्याच्या मांजरीत पाण्याचा प्रश्न बिकट; घोषणाबाजी करत महाविकास आघाडी सरकारचा भाजपानं केला निषेध

महाविकास आघाडी सरकारविरोधात (Mahavikas Aghadi Government) घोषणाबाजी करण्यात आली. रखडलेली पेयजल योजना, रखडलेला उड्डाणपूल याचे फलक हाती घेऊन सरकारचा निषेध करण्यात आला. या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Pune BJP : पुण्याच्या मांजरीत पाण्याचा प्रश्न बिकट; घोषणाबाजी करत महाविकास आघाडी सरकारचा भाजपानं केला निषेध
भाजपातर्फे महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 1:55 PM

मांजरी, पुणे : मांजरी गावातील पाणीप्रश्नी (Water problem in Manjri) भाजपा आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपाने हडपसरमध्ये जागो सरकार आंदोलन केले. भाजपाचे माजी आमदार आणि ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांमध्ये मांजरी गावाचाही समावेश करण्यात आला आहे. सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा शिवाय रखडलेला रेल्वे उड्डाण पूल त्वरित पूर्ण करण्याची मागणी भाजपाने केली आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात (Mahavikas Aghadi Government) घोषणाबाजी करण्यात आली. रखडलेली पेयजल योजना, रखडलेला उड्डाणपूल याचे फलक हाती घेऊन सरकारचा निषेध करण्यात आला. या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

23 गावांमध्ये मांजरीचाही समावेश

पुण्यातील 23 गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर जलसंपदा विभागाकडून पाणी कोट्यात केली वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पुणे महानगरपालिकेला पावणे दोन टीएमसी अधिकचा पाणीसाठा मिळाला. 23 गावे समाविष्ट झाल्याने पाण्याची अतिरिक्त मागणी जलसंपदा विभागाकडे करण्यात येत होती. या 23 गावांमध्ये मांजरीचाही समावेश आहे. मात्र मागील काही दिवसांपासून मांजरीसह इतर काही गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तर सरकारची पेयजल योजना रखडली आहे. त्यावरून भाजपा आता आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

पुण्यात पाणीटंचाई

पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. त्यानुसार प्रशासनातर्फे पाणी जपून वापरण्याचे आवाहनही पुण्करांना करण्यात आले होते. मात्र सरकारच्या नियोजनशुन्यतेमुळे पाण्याची समस्या निर्माण झाल्याचा आरोप भाजपातर्फे करण्यात आला आहे. योगेश टिळेकर यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.