Pune News | भाजपचे ‘मिशन 2024’, बारामतीत खासदार भाजपचाच असणार…बैठकीत काय ठरले?

pune baramati mp election | लोकसभेची निवडणूक 2024 मध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने भाजपचे 'मिशन 2024' सुरु केले आहे. भाजपचे हे मिशन अजित पवार यांच्या बारामतीमध्ये राबवण्यात येणार आहे.

Pune News | भाजपचे 'मिशन 2024', बारामतीत खासदार भाजपचाच असणार...बैठकीत काय ठरले?
bjp number oneImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 9:25 AM

पुणे | 9 ऑक्टोंबर 2023 : लोकसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. राजकीय पक्षांकडून मतदार संघांची बांधणी केली जात आहे. उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. भाजप विरोधात ‘इंडिया’ आघाडी एकत्र आली आहे. परंतु भाजपनेही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपकडून ‘मिशन 2024’ सुरु झाले आहे. आता अजित पवार यांच्या बारामतीमध्ये लोकसभेची तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी बैठकांचे सत्रही सुरु आहे.

भाजप युवा मोर्च्याची बैठक

बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूरमध्ये भाजपाच्या सुपर 100 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपचे मिशन 2024 संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते घराघरात पोहचणार आहे. केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच महाविजय 2024 अंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा लवकरच बारामती लोकसभा मतदार संघात दौरा होणार आहे, असा विश्वास भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी व्यक्त केला.

बारामतीत पुढचा खासदार भाजपचा

बारामती मतदार संघातून पुढचा खासदार भाजपचा असणार आहे, असे अंकिता पाटील यांनी सांगितले. मिशन बारामतीसाठी भाजप सज्ज आहे. यासाठी बारामती लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्याचा आढावा घेतला जात आहे. त्याअंतर्गत इंदापूर विधानसभा मतदारसंघातील सुपर 100 पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. अजित पवार भाजपसोबत येण्यापूर्वीपासून भाजपने या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे.

हे सुद्धा वाचा

जागा अजित पवार गटास मिळणार की नाही?

भाजपने मिशन 2024 ची तयारी प्रत्येक मतदार संघात सुरु केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत आले आहे. त्यांचे या मतदार संघावर वर्चस्व आहे. यामुळे ही जागा त्यांना सोडणार की नाही? हा प्रश्न असताना भाजपकडून तयारी जोरात सुरु झाली आहे. बारामती मतदार संघातून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे उमेदवार असणार आहे. मात्र, भाजप महायुतीचे उमेदवार कोण असणार? हे अद्याप निश्चित नाही.

अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.