‘नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू’, कसब्यातील पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

कसबा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झालाय. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा झटका मानला जातोय. या पराभवानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.

'नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू', कसब्यातील पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 5:22 PM

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत (Kasba by-election result) भाजप उमेदवार हेमंत रासणे (Hemant Rasane) यांचा पराभव झालाय. भाजपसाठी (BJP) हा खूप मोठा धक्का मानला जातोय. कारण गेल्या जवळपास तीन दशकांपासून या मतदारसंघात भाजपची सत्ता होती. पण काँग्रेसने या पोटनिवडणुकीत भाजपच्या वर्चस्वाला सुरुंग लावलाय. ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून कसब्यात प्रचंड राजकीय गदारोळ बघायला मिळाला. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडल्या. अखेर या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झालाय. या निवडणुकीवर भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय.

“कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील‌ जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

‘मराठी माणूस पैशात विकला जात नाही’

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावला आहे. राजकीय पक्षापेक्षा हा येथील विजय हा कार्यकर्त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे या विजयाचे खरे श्रेय हे कसब्यातील कार्यकर्त्यांना जाते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कसब्यातील एक सीट सौ के बराबर आहे असं म्हणून त्यांनी कसब्यातील जागेच महत्वही अधोरेखित केले आहे. साम,दाम ,दंड भेद सगळं वापरून बघितलं मात्र विजय कार्यकर्त्यांचा झाला असल्याचे सांगत त्यांनी हा विजय फक्त कार्यकर्त्यांमुळे मिळाला असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

“ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने केला आहे”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कसबा येथून भाजपची पकड सुटली आहे, फडणवीस आणि शिंदेंना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.