अजितदादा आलेत की आज पुन्हा गायब झाले? या प्रश्नाने सुरु झाली नवीन चर्चा

BJP leader chandrakant patil : पुण्यात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील एका बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बैठकीपूर्वीच चांगली फटकेबाजी केली. त्यानंतर भारती विद्यापीठामधील कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी केली.

अजितदादा आलेत की आज पुन्हा गायब झाले? या प्रश्नाने सुरु झाली नवीन चर्चा
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 2:24 PM

अभिजित पोते, पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार चांगलेच चर्चेत आहेत. कधी ते भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगते तर कधी ते भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा रंगवली जाते. पुणे शहरानंतर अजित पवार यांच्या सासूरवाडीतही महाराष्ट्राच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादा असं लिहिलेली बॅनर्स झळकले आहेत. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना आज दोन मोठ्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट झाली. या भेटीपूर्वी अजितदादा आलेत का? की आज पुन्हा गायब झाले? असा प्रश्न विचारला गेला. यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली.

नेमके काय झाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपण 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काय तर आताच मुख्यमंत्री पदासाठी दावा करु शकतो, असं मोठं वक्तव्य नुकतेच केले होते. त्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी त्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले.

हे सुद्धा वाचा

बुधवारी पुणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये कालवा समितीची बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील उपस्थित राहणार होते. मग या बैठकीच्या काही काळ आधी चंद्रकांत पाटील सर्किट हाऊस ठिकाणी पोहचले. त्यांनी गाडीतून उतरताच प्रश्न विचारला. त्यांनी कार्यकर्त्यांना सवाल केला की, अजितदादा आले आहेत का की आज देखील गायब झाले. त्यांच्या या प्रश्नामुळे कार्यकर्ते आणि अधिकारी अवाक् झाले आणि चर्चांना सुरुवात झाली.

चंद्रकांत पाटील यांची फटकेबाजी

भारती विद्यापीठाचा 28 वा फाऊंडेशन डे चा कार्यक्रमास चंद्रकांत पाटील यांची उपस्थित होती. यावेळी त्यांनी चांगलीच फटकेबाजी केली. ते म्हणाले, ‘पाणी सोडा म्हणून माझ्यावर दबाव असतो. पण पालकमंत्री म्हणून मला पाणी सोडता येत नाही. त्यासाठी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी, पाणी लागते. पाण्याचे गणित दर चार महिन्यात बदलत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. काँग्रेसचे नेते माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले होते

राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही यावर भाष्य केलं आहे. आमचा पक्ष वाढला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. आमच्या नेत्याने (अजित पवारांनी) सूचित केले म्हणजे उद्याच त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असे नाही. पक्षाला मोठे करा, स्पर्धेत भाग घेण्याची प्रत्येकाला इच्छा आहे. राष्ट्रवादीला बळकट करायचे आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करतोय, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.