AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Girish Mahajan : भाजपाकाळात एक दिवसही भारनियमन करावं लागलं नाही, वीजप्रश्नी गिरीष महाजनांची पुण्यात महाविकास आघाडीवर टीका

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi)आल्यापासून वीजेची समस्या राज्यात निर्माण झाली आहे. आधी समस्या निर्माण करायची आणि मग ती पुसायची हे महाविकास आघाडीचे काम आहे, अशी टीका भाजपा नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

Pune Girish Mahajan : भाजपाकाळात एक दिवसही भारनियमन करावं लागलं नाही, वीजप्रश्नी गिरीष महाजनांची पुण्यात महाविकास आघाडीवर टीका
भाजपा नेते गिरीष महाजनImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 3:29 PM
Share

पुणे : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आल्यापासून वीजेची समस्या राज्यात निर्माण झाली आहे. आधी समस्या निर्माण करायची आणि मग ती पुसायची हे महाविकास आघाडीचे काम आहे, अशी टीका भाजपा नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. वीजप्रश्नावरून त्यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले, कधी कोळशाकडे बोट दाखवायचे तर कधी केंद्र सरकारकडे… कोळशाअभावी (Coal) कोणतेही वीजकेंद्र बंद नाही. 2 हजार मेगावॅटची वीजकेंद्रे आज बंद आहेत. वीजकेंद्र बंद ठेवण्यामागे दलालीचे काम आहे. चढ्या भावाने वीज खरेदी करून दलाली मिळवायची हे काम राज्य सरकारचे चालले आहे. मात्र केंद्र सरकारने आता बंधन घातले आहे. चढ्या भावाने कोळसा खरेदी करायचा आणि मग चढ्या भावाने विकायचा हा धंदा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘फक्त दलाली करण्याचे काम’

पुढे ते म्हणाले, की ग्रामीण भागात विजेची मोठी टंचाई आहे. उद्योजकांना उद्योग चालवणे कठीण झाले आहे. राज्य सरकारच्या अशा कामांमुळे सगळी जनता ही मेटाकुटीला आली आहे. खरिपाचा हंगाम गेला. अतिवृष्टी झाली सगळीकडे, पण वीज नसल्याने शेतकऱ्यांना काही पिकवता येत नाही. भाजपा होते तेव्हा एक दिवसही लोडशेडिंग करावे लागले नाही. टान्सफॉर्मरमुळे वीज एक दिवसही बंद नव्हती. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे वीजमंत्री असताना वीजटंचाईला तोंड द्यावे लागले नाही. फक्त दलाली करण्याचे काम राज्य सरकारचे चालले असल्याचे ते म्हणाले.

‘सगळे मंत्रिमंडळ अकार्यक्षम’

ते म्हणाले, की आमची मागणी आहे, की काहीही करा मात्र वीज द्या. उन्हाळ्याचे दोन महिने आहेत. पाऊस लवकर पडणार नाही, त्यामुळे लोकांना वीज द्या अशी मागणी त्यांनी केली. नितीन राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की नितीन राऊतच नाही तर सगळे मंत्रिमंडळ अकार्यक्षम आहेत. मुख्यमंत्री तर आहेत की नाहीत हा प्रश्न आहे. दोन वर्षांनंतर मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरी चढले. इतर राज्यात कमी-जास्त असेलही. पण आपल्या राज्यासारखी परिस्थिती कुठे नाही.

‘तिघांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला’

तिघांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. मुख्यमंत्री एक म्हणताय ,अजित दादा वेगळे म्हणतात. नितीन राऊत वेगळे म्हणतात. मात्र यांनी महाराष्ट्राची वाट लावली असल्याची टीका त्यांनी केली. 2 हजार मेगावॅटची केंद्रे बंद पडली आहेत. केंद्र सरकारने सांगितले आहे, की आम्ही कोळसा देऊ. मात्र जनतेची सहानुभूती मिळवण्याचे काम सुरू आहे, असे ते यावेळी म्हणाले.

आणखी वाचा :

Pune Chitra Wagh : रघुनाथ कुचिक प्रकरणी माझ्यावर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे, चित्रा वाघांचं पुणे पोलिसांना पत्र

Pune SDPI Vs Raj Thackeray : अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, ‘एसडीपीआय’च्या अझहर तांबोळींचा राज ठाकरेंना इशारा

Pimpri Chinchwad crime : आठ वर्षाच्या चिमुरड्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून! पिंपरी चिंचवडच्या चिखलीतली हृदयद्रावक घटना

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.