Solapur | भाजप नेते शहाजी पवार यांच्या मुलीच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या मुलीच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. Shahaji Pawar Daughter Marriage
सोलापूर: भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या मुलीच्या शाही लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या बहुतांश वऱ्हाड्यांनी मास्क घातला नसल्याचे दिसून आले. विशेष बाब म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या लग्नाला उपस्थिती लावली होती. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार राम सातपुतेंच्या शाही विवाह सोहळ्यातील सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा राज्यभर चर्चेचा विषय झाला होता. (BJP leader Shahaji Pawar daughter marriage Social Distancing not followed)
मान्यवरांची विवाह सोहळ्याला उपस्थिती
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला मान्यवरांनी उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले. राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह सोलापूर शहरातील मान्यवर या विवाह सोहळ्यास उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे या लग्न सोहळ्याला वऱ्हाड्यांपेक्षा कार्यकर्त्यांची गर्दी जास्त होती. कोरोना विषयक नियमांचे पालन केले नाही तर सर्वसामान्यांवर कारवाई करणारे प्रशासन या प्रकरणी कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आमदार राम सातपुतेंच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते गेल्या काही दिवासापूर्वी विवाहबंधनात अडकले. पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये अत्यंत थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मात्र सातपुतेंच्या लग्नात पाहुण्यांची अलोट गर्दी लोटल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली होती.
राम सातपुते यांच्या लग्नाला हजारो पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते. लग्न सोहळ्यातील फोटोमध्ये अनेक पाहुणे आणि नेते मंडळींनी तोंडाला मास्क लावला नसल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या संख्येने गर्दी असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही बोजवारा उडाला होता. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी राम सातपुतेंच्या विवाह सोहळ्याची चौकशी करण्यात येईलं, असं जाहीर केलं होते.
भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नाची चौकशी होणार! https://t.co/c7YUNLT9tq @RamVSatpute @Dev_Fadnavis @mipravindarekar @ChDadaPatil @BJP4Maharashtra #marriage #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 23, 2020
संबंधित बातम्या:
सामान्यांवर कारवाई होते तर मग यातल्या ‘सामान्यां’वर कारवाई होणार का? सोशल मीडिया संतप्त
Ram Satpute | भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नात नियमांना हरताळ, अनेक नेते विनामास्क
(BJP leader Shahaji Pawar daughter marriage Social Distancing not followed)