AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे जिल्ह्यात तिन्ही लोकसभा मतदार संघात भाजपची तयारी, या तिघांवर दिली जबाबदारी

खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. परंतु त्यापूर्वीच भाजपने मिशन 2024 सुरु केले आहे. पुणे जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघाची जबाबदारी वाटून दिली आहे. आता उमेदवार तेच असणार का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

पुणे जिल्ह्यात तिन्ही लोकसभा मतदार संघात भाजपची तयारी, या तिघांवर दिली जबाबदारी
bjp Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 3:20 PM

प्रदीप कापसे, पुणे : भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. परंतु भाजपने मिशन 2024 मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजप कुणाच्या गळ्यात निवडणुकीची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना भाजपने संपूर्ण पुणे जिल्ह्याची तयारी सुरु केली आहे. पुणे जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघाची जबाबदारी वाटण्यात आली आहे.

कोणावर दिली जबाबदारी

पुण्यातील तीन लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा राहुल कुल यांच्याकडे दिली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली आहे. हे तिघेही लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार मानले जातात. मात्र निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उमेदवारी त्यांनाच मिळणार का ? यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे.

हे सुद्धा वाचा

बारामतीवर विशेष लक्ष

बारामती लोकसभा मतदार संघात दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ येतो. या लोकसभा मतदार संघावर १९९१ पासून पवार कुटुंबियांचे वर्चस्व आहे. या मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे आली आहे. आता शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली आहे.

शिरुरमध्ये काय होणार

जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी अन् हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदार संघात येतो. २००९ पासून या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व होते. परंतु २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेने ही जागा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे या ठिकाणी खासदार झाले.

पुणे बापट यांचा वारसा कोण

पुणे लोकसभा मतदार संघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे छावणी अन् कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ येतो. २०१४ पासून या ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. गिरीश बापट २०१९ मध्ये या ठिकाणी खासदार झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यामुळे सध्या ही जागा रिक्त आहे. आता या ठिकाणी मुरलीधर मोहोळ हे त्यांचे वारसदार ठरणार का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक.
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं...
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं....
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम.
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?.
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात.