डोळे असलेले म्हणजेच यश गाठता येते असे नाही, वाचा अंध साक्षीची IIM भरारी
जिद्द, परिश्रम करण्याची तयारी असली तर मग काहीही शक्य आहे. ज्या ठिकाणी लाखो डोळस विद्यार्थ्यांशी स्पर्धा आहे , त्या ठिकाणी अंध साक्षीने यश मिळवले. असे यश मिळवणारी ती पहिलीच विद्यार्थीनी ठरली आहे.
पुणे : 20 वर्षीय साक्षी अमृतकर. जन्मतः अंध. परंतु जिद्दीचे शिखर ती गाठत राहिली. पालकही त्यासाठी तिला नेहमी धीर देत होते, पाठिंबा देत होते. आता इंदूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एमबीएसाठी प्रवेश मिळाला आहे. ही यश गाठणारी ती नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड (NFBM) महाराष्ट्राची पहिली विद्यार्थिनी आहे. साक्षी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील अंध मुलींच्या शाळेची विद्यार्थीनी आहे. 25 जून रोजी साक्षी संस्थेत इंदूर आयआयएममध्ये दाखल होत आहे.
कशी करत होती अभ्यास
साक्षीची आई तिला पाठ्यपुस्तकाची पाने स्कॅन करुन देत होती. ती ते पीडीएफ किंवा वर्ड डॉक्युमेंटमध्ये रूपांतरित करायची जेणेकरून मी अभ्यासासाठी टॉकबॅक स्क्रीन रीडर वापरू शकेन. कॉलेजच्या दिवसांत तिला लॅपटॉप मिळाला आणि त्यामुळे अभ्यास करणं खूप सोपं गेल्याचे साक्षी सांगते. साक्षीच्या वडिलांचे फॅब्रिकेशन युनिट होते. कोविडमुळे ते बंद पडले. यामुळे ग्रंथपाल असणाऱ्या तिच्या आईवर घराची आर्थिक जबाबदारी आली.
पहिल्याच प्रयत्नात सीए फाऊंडेशनचा कोर्स पास
साक्षीने वयाच्या 16 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात सीए फाऊंडेशनचा अभ्याक्रम उत्तीर्ण केला. पण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय तिने घेतला. तिने गेल्या वर्षी कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT) साठी दिली. त्यात तिला यश आले. मुलाखतीनंतर तिला 11 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) कडून कॉल आले. शेवटी तिने आयआयएम-इंदूरमध्ये शिकण्याचा निर्णय घेतला.
जागृती स्कूलच्या प्रोजेक्ट डायरेक्टर आणि एनबीएफएमच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सकीना बेदी म्हणतात की, 350 माजी विद्यार्थ्यांपैकी साक्षी ही पहिलीच विद्यार्थिनी आहे जिने टॉप बी-स्कूलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
साक्षीने तिच्या पालकांसाठी प्रथमच विमान तिकीट खरेदी केले आहे. साक्षी म्हणते, “मला दिसत नाही हे पाहून ते घाबरले होते. त्यांनी माझी वैद्यकीय तपासणी अनेक डॉक्टरांकडे केली. मला रेटिनाइटिस पिगमेंटोसा नावाचा आजार होता. त्यामुळे डोळयातील पडदा प्रभावित झाला होता. हा आजार दुर्मिळ आहे. त्यावर उपचार नव्हते. मग पालकांनी तिला शैक्षणिकदृष्ट्या प्रगत केले.