Brahman Mahasangh Vs NCP : अमोल मिटकरी मानसिक आजारी, आपल्या वक्तव्यातून लायकी दाखवली; पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून निषेध
धक्काबुक्की आम्हालाच नाही, तर आम्हीही धक्काबुक्की केली, असे महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले. आम्ही त्यांच्या घरात घुसलो आणि यापुढेही त्यांच्या घरात घुसू, असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर अजित पवारांनी पक्षात काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
पुणे : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून ब्राम्हण महासंघाने (Bhahman Mahasangh) राष्ट्रवादीविरोधात आंदोलन पुण्यात आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसण्याचा यावेळी त्यांनी प्रयत्न केला. यावेळी अमोल मिटकरी (Amol mitkari) यांच्याविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला होता. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या विधानाचा समाचार घेत राष्ट्रवादीवर टीका केली. आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी त्यांना आत येण्यास अडवले. त्यामुळे ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. धक्काबुक्की आम्हालाच नाही, तर आम्हीही धक्काबुक्की केली, असे महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले. आम्ही त्यांच्या घरात घुसलो आणि यापुढेही त्यांच्या घरात घुसू, असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर अजित पवारांनी पक्षात काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
‘राष्ट्रवादी घाबरली’
ब्राह्मण महासंघाच्या महिला कार्यकर्त्याही यावेळी आक्रमक झाल्या होत्या. आमच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काय उत्तर देणार, राष्ट्रवादी घाबरली आहे. आम्हाला राष्ट्रवादी येऊच देत नाहीय. कारण आमच्या ताकदीला ते घाबरले आहेत, असे महिला कार्यकर्त्या म्हणाल्या. आम्ही घरात घुसून त्यांना उत्तर दिले आहे, यापुढेही घुसणार असल्याचा इशारा देण्यात आला. अमोल मिटकरी मानसिक आजारी, हाच आमचा संदेश आहे. त्यांचा निषेध आम्ही करायला गेलो, तो राष्ट्रवादीने करू दिला नाही, असे महिला कार्यकर्त्या म्हणाल्या.
‘गृहमंत्र्यांनी कारवाई करावी’
लग्नाचा विधी अत्यंत सुंदर पद्धतीने हिंदू समाजात केला जातो. मात्र त्यांनी चुकीचा अर्थ सांगितला आहे. अमोल मिटकरी यांचे वाक्य निषेधार्ह आहे. पक्षानेही याबाबत काहीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. ‘मम भार्या समर्पयामी’चा अर्थ काय? हे पक्षालाही माहीत नाही का? जातीय तेढ वाढवायची नाही, हे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. आता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीच यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
‘ज्यांनी निवडून दिले, त्यांच्यात मानगुटीवर पाय देता’
ज्या विषयातली माहिती नाही, त्याविषयी का बोलावे, कोणत्याही समाजावर का बोलावे, असा सवाल करण्यात आला आहे. अशा वाक्यांमुळे त्यांनी त्यांची लायकी दाखवली आणि मोठ्या पदावरील मंत्री दात काढून हसतात. ज्यांनी निवडून दिले, त्यांच्यात मानगुटीवर पाय देता, असा संताप ब्राह्मण महासंघाच्या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.