सहलीसाठी 34 विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या बसचे ब्रेक फेल, चालकाने काय केले पाहा

बसचे ब्रेक निकामी झाल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान दाखवलं. चालत्या बसमधून उडी मारली.

सहलीसाठी 34 विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या बसचे ब्रेक फेल, चालकाने काय केले पाहा
एसटी बस
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 8:15 AM

विनय जगताप, भोर, पुणे : पुणे जिल्ह्यात मोठा दुर्घटना चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे टळली. म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तोच प्रकार विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ३४ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. याबद्दल चालकाचे कौतूक होत आहे. विद्यार्थी सहलीसाठी निघाले असताना बसचे ब्रेक फेल झाले. त्यावेळी चालकाने समयसूचकता दाखवत गाडीतून उडी मारली. बसच्या चाकापुढे दगड ठेवले. या पद्धतीने बस थांबवली. या प्रकारामुळे विद्यार्थी घाबरले होते. परंतु काही वेळात त्यांना चांगलाच धीर मिळाला.

काय झाला प्रकार

बारामतीच्या मोरगावमधील खाजगी क्लासच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. बसचे ब्रेक निकामी झाल्याचं लक्षात येताच चालकाने रस्त्यावरच्या नागरिकांना सावध केले. त्यानंतर चालत्या बसमधून उडी मारून चाकाखाली दगड टाकून बस थांबवली. चालकाने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळलाय. बस वरंधघाट मार्गे रायगड किल्ल्यावर विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात होती. पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात ही घटना घडली. बसमध्ये एकूण 34 विद्यार्थी होते. हा सगळा थरार cctv मध्ये कैद झालाय.

हे सुद्धा वाचा

विद्यार्थी मोरगावमधील सहलीसाठी मोरगावमधील खाजगी क्लासच्या 34 विद्यार्थ्यांना घेऊन मांढरदेवीचे दर्शन करून बस (क्रमांक MH12 HC 9119) निघाली होती. बस भोर वरंधघाट मार्गे रायगडला जात असताना चौपाटीजवळ बसचा ब्रेक निकामी झाला. एअर पाईप फुटल्याने हा ब्रेक निकामी झाला. बसचे ब्रेक निकामी झाल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान दाखवलं. चालत्या बसमधून उडी मारून बसच्या चाकाखाली दगड टाकून बस थांबवली. बसमधले सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचले. चालक आणि विद्यार्थ्यांना धीर देत रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडवली.

सर्व सुखरुप

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाहीत. बसमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सुखरुप आहेत. वेळ आली होती पण काळ आला नव्हता, म्हणूनच बसची मोठी दुर्घटना टळली. सर्व पालकांनी चालकाचे कौतूक केले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.