AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking news | काळाचा घाला, इंदोर-अमळनेर बस मध्यप्रदेशात नर्मदा नदीत कोसळली, तब्बल 13 जणांचा मृत्यू; जखमींमध्ये पुणे, जळगावच्या प्रवाशांचाही समावेश

आज इंदोरहून पुण्याकडे (Pune) जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाला आहे. धारमध्ये ही बस थेट पुलावरून कोसळली आहे. या भीषण अपघातात तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Breaking news | काळाचा घाला, इंदोर-अमळनेर बस मध्यप्रदेशात नर्मदा नदीत कोसळली, तब्बल 13 जणांचा मृत्यू; जखमींमध्ये पुणे, जळगावच्या प्रवाशांचाही समावेश
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 12:49 PM

मुंबई : मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) सोमवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडलीयं. आज इंदोरहून अमळनेरकडे जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाला आहे. धारमध्ये ही बस थेट पुलावरून कोसळली आहे. या भीषण अपघातात तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येते आहे. ही बस पाण्यात कोसळलेल्याचेही अनेक व्हिडिओ (Video) समोर आले आहेत. या व्हिडिओमधून या अपघाताची दाहकता दिसून येते. ही बस नर्मदा नदीमध्ये पडली असून आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालायं.

55 प्रवासी होते बसमध्ये 

मध्य प्रदेशात सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडलीयं. 55 प्रवाशांसह बस खरगोन आणि धार जिल्ह्यांच्या सीमेवर नर्मदा नदीत पडली. हा अपघात खलघाटात बांधण्यात आलेल्या नर्मदा पुलाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ही प्रवासी बस इंदूरहून अमळनेरला जात होती. माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे. खरगोन-धार डीएम आणि एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि प्रवाशांना वाचवण्याचे काम सुरू आहे. 

हे सुद्धा वाचा

पुलाचे रेलिंग तोडून बस थेट नदीत

खरगोनचे एसपी धरमवीर सिंह यांनी आजतकला बोलताना सांगितले की, 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. बचावलेल्या लोकांनी सांगितले की, पुलाचे रेलिंग तोडून बस थेट नदीत न पडता दगडांवर पडली, त्यानंतर ती ओसंडून वाहणाऱ्या नदीत उलटली. बसमध्ये जवळपास 55 लोक होते. घटनास्थळी बचावकार्य राबवत असलेल्या बचाव दलाने बसमध्ये अडकलेल्या आणि नदीत बुडालेल्या लोकांचा शोध सुरू केला आहे.

pune

एसटी महामंडळाने दिला हेल्पलाईन नंबर

सकाळी ही बस इंदूरहून निघाली होती. वाटेत खलघाटात ही बस नर्मदा नदीत कोसळली आहे. एम.एच. -40 – 9848 असा या बसचा क्रमांक आहे. बसचालक सी.ई. पाटील व वाहक पी.एस. पाटील यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती अमळनेर आगार प्रमुख अर्चना भदाणे यांनी दिलीयं. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने 022/23023940  हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर आगाराची इंदोर अमळनेर बस क्रमांक एम. एच. 40 एन 9848 ही आज दि. 18 जुलै, 2022 रोजी सकाळी 07.30 वा. इंदोर येथुन अमळनेरकडे मार्गस्थ झाली. आज सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर सदर बस अपघातग्रस्त होवुन नर्मदा नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले असुन बस क्रेन च्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत असुन 1 जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करणेत येवुन त्यांचेवर उपचार सुरु आहेत, त्यांचे प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेणेचे काम सुरु आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतुने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

हेल्पलाईन क्रमांक : घटनास्थळी मदतीसाठी 09555899091.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 02572223180, 02572217193.

नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.