काय सांगता … समाज कल्याण अधिकाऱ्याच्या कार्यालयात आढळले पैश्यांचे बंडल
मी अन्य ठिकाणी बैठक असल्यामुळे मी निघून गेलो. त्याने पैसे ठेवले की नाही हे देखील मला माहिती नव्हतं. परंतु त्यांची हालचाल संशायास्पद होती. त्यांनी पैसे वैगरे फेकले असं काही घडलं नाही, पैसे किती देतो असं देखील काहीही बोलेलं नाही.-
पुणे – जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांच्या कार्यलयामध्ये नुकताच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या केबिनमध्ये मास्क घालून आलेल्या व्यक्ती पैश्याचे बंडल ठेवत तिथून पसार झाल्याची घटना घडली आहे.
अशी घडली घटना
पुणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांच्या केबिनमध्ये एक मास्कधारक व्यक्ती आला. त्यानंतर त्या व्यक्तीने कोरगंटीवार यांना दलित वस्तीची कामे मंजूर करायची आहेत असे सांगितले. त्यावर कोरगंटीवार यांनी प्रस्ताव योग्य असेल तर तो मंजूर होईल, असे सांगितले. याबरोबरच आमचे संबंधित निरीक्षक सध्या सुट्टीवर असून त्या आल्या की तुमचा प्रस्ताव पुढे पाठवला जाईल. मात्र त्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने दुसऱ्या निरीक्षकास मी बोलावलं आणि त्यांना सांगितलं की यांची जी फाईल आहे ती तत्काळ मांडा आणि नियमानुसार असतील तर मंजूरीसाठी सादर करा. त्यानंतर संबंधित अधिकारी पुढील बैठकांसाठी निघून गेले. मात्र त्या अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पैश्याचे बंडल आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली.
अज्ञात व्यक्तीचा लाच देण्याचा प्रयत्न त्यानंतर मास्कधारी व्यक्तीने संबंधित अधिकाऱ्याला काही ऑफर देण्याचा प्रयत्नही केला. मात्र अधिकाऱ्याने त्यांना तुम्हा कुणालाही पैसे देण्याची गरज नाही. तुमचे काम योग्य असले तर नक्की मंजूर होतील असे सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्ती अँटी चेंबरला गेला.
मी अन्य ठिकाणी बैठक असल्यामुळे मी निघून गेलो. त्याने पैसे ठेवले की नाही हे देखील मला माहिती नव्हतं. परंतु त्यांची हालचाल संशायास्पद होती. त्यांनी पैसे वैगरे फेकले असं काही घडलं नाही, पैसे किती देतो असं देखील काहीही बोलेलं नाही. ती व्यक्ती कुठे आहे याबाबत मला काहीच माहिती नाही, असे मत प्रवीण कोरगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात ” समाजकल्याण अधिकारी हे आज बाहेर एका बैठकीसाठी गेले होते. तेव्हा आम्हाला अशी माहिती समजली की त्यांच्या कक्षात पैशांचे बंडल दिसून आले. यावर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी आम्हाला सांगिते की मी सध्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आय़ुक्तांकडे बैठकीसाठी आलेलो आहे. त्यानंतर ते जेव्हा स्वतः कार्यलयात आले, त्यांच्या अँटी चेंबरमध्ये काही पाचशेच्या नोटा आढळून आल्या, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
पोलिसात तक्रार दाखल
या घटनेवरून संबंधित अधिकाऱ्याला बदनाम करण्यासाठी , अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार केल्याचा अंदाज आहे. याबाबत तातडीने पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधण्यात आला. संबंधित घटनेची पोलीस चौकशी केल्यानंतर अहवाल मिळेल.
Shivendraraje | पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडू नये; शिवेंद्रराजे, शशिकांत शिंदे यांच्यात जुंपली
Video: स्कुटीची थोडीही मोडतोड न करता, डिकीतील सामान गायब, पाहा चोरांची हातचलाखी!