Pune fire incident : पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाट्याजवळ ट्रक जळून खाक; कागदामुळे भडकली आग
पुणे येथून आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. 04 ई. एल. 7734 कागदाचे पुठ्ठे घेऊन नाशिककडे जात होता. आळेफाट्याच्यापुढे आळेखिंड परिसरात या वाहनाला आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या बाजूला उभे केले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला.
पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik highway) आळेफाटा येथे मध्यरात्री पुठ्ठा घेऊन जाणारा ट्रक जळून खाक झाला आहे. पुण्याकडून नाशिकच्या दिशेने हा ट्रक जात असताना आळेफाट्यापासून काही अंतरावर गेला असता अचानक या ट्रकला भीषण आग (Fire) लागली. त्यामुळे महामार्गावर मध्यरात्री मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. 04 ई. एल. 7734 कागदाचे पुठ्ठे घेऊन नाशिककडे जात होता. आळेफाट्याच्यापुढे आळेखिंड परिसरात या वाहनाला आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या बाजूला उभे केले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग इतकी भयंकर होती की काही वेळातच संपूर्ण टेम्पो जळून खाक (Burnt) झाला.
आधीही घडल्या आगीच्या घटना
या आगीमुळे महामार्गावर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची काही वेळ कोंडी झाल्याने पोलिसांनी या दुर्घटनेनंतर पुणे-नाशिक वाहतूक एकेरी वळवली होती. दरम्यान, याआधीही अशा आगीच्या घटना घडल्या असून मालवाहू ट्रक खाक झाला होता.