Pune GST fraud : सात कोटी रुपयांच्या जीएसटी फसवणुकीप्रकरणी पुण्यातल्या व्यावसायिकाला अटक

करदात्याने कोणतीही वस्तू किंवा सेवा न घेता 41 कोटी रुपयांच्या करपात्र मूल्याच्या बोगस पावत्या खरेदी केल्या आहेत आणि अशा प्रकारे 7.38 कोटी रुपयांच्या चुकीच्या आयटीसीचा लाभ घेतला आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Pune GST fraud : सात कोटी रुपयांच्या जीएसटी फसवणुकीप्रकरणी पुण्यातल्या व्यावसायिकाला अटक
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 1:10 PM

पुणे : सात कोटी रुपयांच्या GST फसवणुकीप्रकरणी पुण्यातील व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य जीएसटी विभागाने ही कारवाई केली आहे. 41 कोटींहून अधिक रुपयांच्या बनावट बिलांवरून 7.38 कोटी रुपयांच्या कथित बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) दाव्यासाठी पुण्यातील व्यावसायिकाला अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्रवीण गुंदेचा हा व्यापारी एका खासगी धातू कंपनीचा मालक आहेत. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, नवीन नोंदणीकृत करदात्यांच्या कागदपत्रांची तपासणी करताना विभागाला मेसर्स जिरावाला मेटल्स (M/s Jirawala Metals) या कंपनीत काहीतरी संशयास्पद सुरू (Suspicious business activity) असल्याचे लक्षात आले. अधिक तपासणी केली असता जवळपास 41 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे संशयास्पद व्यवहार आढळून आले. याप्रकरणाचा आता अधिक तपास सुरू झाला आहे, असे संबंधित विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

खरेदी केल्या बोगस पावत्या

महाराष्ट्र राज्य जीएसटी, पुणे इन्व्हेस्टिगेशनच्या पथकांनी 12 एप्रिल रोजी पुणे येथे असलेल्या या करदात्याच्या व्यावसायिक परिसराची तपासणी भेट घेतली, असे अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तपासणीच्या भेटीच्या वेळी, असे आढळून आले, की या करदात्याच्या पुरवठादारांनी घराच्या मालकांच्या माहितीशिवाय घरातून गोळा केलेली वीज बिले यांसारखी बनावट कागदपत्रे देऊन आणि रजा आणि परवाना करार करून GST नोंदणी मिळवली होती, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. करदात्याने कोणतीही वस्तू किंवा सेवा न घेता 41 कोटी रुपयांच्या करपात्र मूल्याच्या बोगस पावत्या खरेदी केल्या आहेत आणि अशा प्रकारे 7.38 कोटी रुपयांच्या चुकीच्या आयटीसीचा लाभ घेतला आहे, असे त्यात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

याप्रकरणी आता कंपनीचा मालक गुंदेचा याला अटक करण्यात आली आणि बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, असे विभागाने सांगितले आहे. यासह चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत राज्य जीएसटी विभागाने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 10 आरोपींना अटक केली आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. फसवणूक, करचुकवेगिरीच्या रॅकेटमध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी विभाग कोणतीही कसर सोडणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.