Atheist conference : पुण्यातल्या नवी पेठेत आज नास्तिक मेळावा, रामनवमीमुळे विश्रामबाग पोलिसांनी केला होता रद्द

रामनवमीमुळे रद्द झालेला नास्तिक मेळावा (Atheist conference) अखेर आज पुण्यात होत आहे. पंधरवड्यानंतर शहीद भगतसिंग विचारमंच आयोजित सातवा नास्तिक मेळावा (नास्तिक परिषद) 2022, नवी पेठेत होत आहे.

Atheist conference : पुण्यातल्या नवी पेठेत आज नास्तिक मेळावा, रामनवमीमुळे विश्रामबाग पोलिसांनी केला होता रद्द
नास्तिक मेळावा, पुणे
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 9:47 AM

पुणे : रामनवमीमुळे रद्द झालेला नास्तिक मेळावा (Atheist conference) अखेर आज पुण्यात होत आहे. पंधरवड्यानंतर शहीद भगतसिंग विचारमंच आयोजित सातवा नास्तिक मेळावा (नास्तिक परिषद) 2022, नवी पेठेत होत आहे. येथील एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 1.30 या वेळेत होत असलेल्या या संमेलनात वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ते असीम सरोदे (Asim Sarole) , लेखक तुकाराम सोनवणे आणि चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर हे प्रमुख वक्ते असतील. ही परिषद यापूर्वी 9 एप्रिल रोजी होणार होती. मात्र रामनवमीमुळे (Ram Navmi) ती रद्द करण्यात आली होती. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, रामनवमीच्या दिवशी असा कार्यक्रम आयोजित केल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, या भीतीने पुणे शहर पोलिसांनी त्यांना परिषद पुढे ढकलण्यास सांगितले होते.

विश्रामबाग पोलिसांनी रद्द केला होता कार्यक्रम

संमेलनाचे ठिकाण विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. 8 एप्रिल रोजी संयोजकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात संमेलनाची माहिती देणारे पत्र दिले होते. परंतु पोलिसांनी उत्तर म्हणून शहीद भगतसिंग विचारमंच पुणेच्या सदस्यांना पत्र देऊन संमेलन पुढे ढकलण्यास सांगितले.

विचार स्पष्टता नसल्याने रद्द

विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या स्वाक्षरीच्या पत्रात रामनवमी किंवा कायदा व सुव्यवस्थेच्या संभाव्य समस्यांचा उल्लेख नाही. या पत्रात असे म्हटले आहे, की संमेलनादरम्यान वक्ते कोणते विचार आणि विषय मांडतील ते आयोजकांनी स्पष्ट केले नाही. पत्रात असेही सुचवले आहे, की 10 एप्रिल ऐवजी 24 एप्रिल 2022 रोजी मेळावा आयोजित करावा. या पत्रात संयोजकांना संमेलनात कोणकोणत्या विषयांवर वक्ते संबोधित करतील याची आगाऊ आणि लेखी माहिती देण्यास सांगितले.

असीम सरोदे आणि सुनील सुकथनकर यांना आमंत्रण

आम्ही 24 एप्रिल रोजी सातवी नास्तिक मेळावा आयोजित करणार आहोत. राज्याच्या विविध भागातून नास्तिक सहभागी होत असल्याने आम्हाला चांगला प्रतिसाद अपेक्षित आहे, असे संयोजक डॉ. नितीन हांडे यांनी सांगितले. प्रा. डॉ. शरद बाविस्कर आणि डॉ. मुग्धा कर्णिक हे पहिल्या कार्यक्रमाला वक्ते म्हणून उपस्थित राहणार होते, पण ते आजच्या संमेलनाचा भाग नाहीत. नास्तिक मेळावा रद्द झाल्यानंतर डॉ. कर्णिक यांनी ऑनलाइन भाषण केले. प्रा. बाविस्कर 24 एप्रिलला उपलब्ध नसणार आहेत. त्यामुळे आम्ही असीम सरोदे आणि सुनील सुकथनकर यांना आमंत्रित केले आहे, असे हांडे म्हणाले.

आणखी वाचा :

Rajgad Honey bee Attack : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या चौघा जणांवर मधमाशांचा हल्ला, हल्ल्यानंतर पळापळीत महिला दरीत कोसळली

Pune Dam situation : पुण्यात अनेकठिकाणी पाणीटंचाई; पाणीपुरवठा विभागानं फोडलं रस्ता दुरूस्तीच्या कामांवर खापर!

Pune Brinton Pharma : यूकेमध्ये संशोधन आणि विकास केंद्र स्थापन करणार पुण्यातील ब्रिंटन फार्मा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.