Child marriage : सतराव्या वर्षी मुलीची प्रसूती, पुण्यातला धक्कादायक प्रकार; पतीसह आई-वडिल, सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
पुणे शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानुसार मुलीचे पालक, पती आणि सासरच्यांविरुद्ध बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
पुणे : आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीसोबत लग्न (Child marriage) केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ससून जनरल हॉस्पिटलमध्ये नुकतीच प्रसूती 18 वर्षीय एका तरुणीची प्रसूती झाली, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणीचा पती, आई-वडील आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. तिला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले, की ऑगस्ट 2021मध्ये ती अल्पवयीन असताना तिचे लग्न झाले होते. बालविवाह कायद्याने गुन्हा आहे. या प्रकरणात मुलीचे लग्न सतराव्या वर्षीच झाल्याचे उघड झाले आहे. तर प्रसूतीवेळी ती अठरा वर्षांची असल्याचे समोर आले आहे. आता यात मुलीचा पती, सासू-सासरे तसेच तिचे आई-वडिल सहभागी आहेत, याची खात्री पोलिसांनी (Police) केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्येही घडली होती अशीच घटना
पुणे शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानुसार मुलीचे पालक, पती आणि सासरच्यांविरुद्ध बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तपास अधिकारी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे म्हणाले, की तपास सुरू आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या वर्षी फेब्रुवारीमध्ये बाळाला जन्म देणारी महिला 18 वर्षांची झाल्याची माहिती आहे. तिचे लग्न झाले तेव्हा ती अल्पवयीन होती. गेल्या महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या चाकण पोलीस ठाण्यात बालविवाहाचा असाच गुन्हा दाखल झाला होता.
सरकारी रुग्णालयाच्या अधिकृत माहितीनंतर गुन्हा दाखल
हा एफआयआर सरकारी रुग्णालयाकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर दाखल करण्यात आला, ज्याच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले, की ते तीन महिन्यांच्या गर्भवती असलेल्या 17 वर्षीय विवाहित मुलीवर उपचार करत आहेत. पोलिसांनी प्राथमिक तपास केला आणि त्यानंतर मुलीच्या पती आणि वडिलांवर गुन्हा दाखल केला. आरोपींवर बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांखालीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.