Pune accident CCTV : बापरे..! काळजाचा थरकाप उडवणारा Video; अंगावरूनच घातली गाडी, व्यावसायिकावर पुण्यात गुन्हा दाखल
व्यक्तीच्या डोक्यावरून चारचाकी गेल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. मार्केटयार्ड पोलीस (Market police) ठाण्यात अनूप मेहता या व्यावसायिकावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Pune accident CCTV : बापरे..! काळजाचा थरकाप उडवणारा Video; अंगावरूनच घातली गाडी, व्यावसायिकावर पुण्यात गुन्हा दाखल Pune accident CCTV : बापरे..! काळजाचा थरकाप उडवणारा Video; अंगावरूनच घातली गाडी, व्यावसायिकावर पुण्यात गुन्हा दाखल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/27220512/pune-cctv-a-1.jpg?w=1280)
पुणे : रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घातल्याप्रकरणी पुण्यातील (Pune) व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 एप्रिल रोजी पुण्यातील सॅलिसबरी पार्कात ही घटना घडली होती. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. व्यक्तीच्या डोक्यावरून चारचाकी गेल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. मार्केटयार्ड पोलीस (Market police) ठाण्यात अनूप मेहता या व्यावसायिकावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक व्यक्ती फुटपाथच्या बाजूला झोपली होती. त्यावेळी गाडी पुढे घेताना अंदाज न आल्याने या व्यावसायिकाने अंगावरून गाडी चालवली. या प्रकरणात आता व्यावसायिकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना असून याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. भरदिवसा आणि गजबजलेल्या परिसरात झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली होती.
#Pune : रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घातल्याप्रकरणी पुण्यातील व्यावसायिकावर गुन्हा दाखल झालाय. याचं थरकाप उडवणारं #cctvfootage समोर आलंय.@PuneCityPolice #crime #Video अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/5fooBZAYD7
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 27, 2022
अंगावरून गाडी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू
20 एप्रिलला दिवसा घडलेल्या या घटनेत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या कडेला ही व्यक्ती झोपलेली होती. तर व्यावसायिक अनूप मेहता हे चारचाकी गाडी चालवत होते. त्यांना समोर व्यक्ती झोपलेली आहे, हे दिसले नाही. त्यांनी गाडी चालवली ती चक्क रस्त्यावर झोपलेल्या माणसाच्या अंगावरून. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता मेहतांवर गुन्हा दाखल झाला आहे.