गौतमी पाटील हिचा कार्यक्रम बर्थडे बॉयला पडला महागात, पोलिसांनी बर्थडे बॉयला बोलावून घेतलं; मग…

पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता कार्यक्रम करणं भोसरीतील आयोजकांना चांगलंच महागात पडलं आहे. या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच ज्यांच्या वाढदिवस होत्या त्या बर्थडे बॉयवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौतमी पाटील हिचा कार्यक्रम बर्थडे बॉयला पडला महागात, पोलिसांनी बर्थडे बॉयला बोलावून घेतलं; मग...
gautami patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 8:31 AM

पुणे : लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण जसं ठरलं आहे, तसंच गाव तिथे गौतमीचा कार्यक्रम हे समीकरणही ठरलं आहे. राज्यातील एक जिल्हा नसेल तिथे गौतमीचा कार्यक्रम होत नाही. गावाशिवातही गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. गावातील कोणताही कार्यक्रम असला की त्यानिमित्ताने गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. गौतमीची क्रेझ एवढी वाढलीय की आता तर काही मंडळी स्वत:च्या, नातेवाईकाच्या, मुलांच्या, पत्नीच्या वाढदिवसानमित्तानेही गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, एका बर्डथे बॉयला गौतमीचा कार्यक्रम चांगलाच महागात पडला आहे.

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ज्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आली त्याच बर्थडे बॉय असलेल्या अमित शंकर लांडे आणि आयोजक मयूर रानवडे यांच्यावर भोसरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. सोमवारी अमित लांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित केला होता. डान्सचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला असल्याचे बोलले जात असतानाच आता अमित लांडे आणि आयोजक मयूर रानवडे या दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली असताना देखील अमित लांडे यांनी जाहीर कार्यक्रम घेतला. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

परवानगीच नव्हती

दरम्यान, आयोजक मयूर रानवडे यांनी पोलिसांकडे कार्यक्रमाला परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. तसेच भोसरी पोलिसांनी आयोजकांना वरिष्ठ कार्यालयातून परवानगी घ्यावी अशा सूचना केल्या होत्या. पण या आयोजकांनी वरिष्ठ कार्यालयातूनही परवानगी घेतली नाही.

प्रचंड जल्लोष, आतषबाजी

गौतमी पाटील हिचा कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमात प्रचंड आतषबाजी करण्यात आली. स्टेजवरूनच ही आतषबाजी करण्यात आली. पाव्हणं जेवला काय… या गाण्यावर तर सर्वांनीच ठेका धरला होता. गौतमीच्या कार्यक्रमाला कालही प्रचंड गर्दी होती. तरुणाईसोबतच महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी तरुणाईने प्रचंड जल्लोष केला. मात्र, कोणी हुल्लडबाजी केली नाही. पहिल्यांदाच गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी झाली नाही. त्यामुळे पोलिसांचा चोपही बसला नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.