लोकं सांगतात अन् सरकार फक्त आदेश काढतं; शासनाकडे कोणताच ठोस प्लॅन नाही: प्रकाश आंबेडकर

सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन असता तर आपण कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडलो असतो. | Prakash Ambedkar

लोकं सांगतात अन् सरकार फक्त आदेश काढतं; शासनाकडे कोणताच ठोस प्लॅन नाही: प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 8:32 AM

पुणे: कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे कोणताही ठोस प्लॅन नाही. लोकं सांगतात आणि शासन निर्णय घेते. सरकार केवळ आदेश काढण्याचे काम करत आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. (Prakash Ambedkar criticize central and state government)

प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन असता तर आपण कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडलो असतो. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काहीच प्लॅन नाही. कोणते निर्णय घ्यायला पाहिजे, हे शासन ठरवतच नाही. लोकांनी सांगितल्यावर सरकार फक्त आदेश काढण्याचे काम करत आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे दरवर्षी होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अनुयायांना घऱातूनच अभिवादन करण्याचे आवाहन केले. 1 जानेवारी या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस असल्याचे आम्ही मानतो. जोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होत नाही तोपर्यंत या दिवसाचे महत्व कायम राहील, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

‘मुंबई-पुण्यातील लोकल सुरु व्हायला पाहिजे होती’

राज्यात वाहतुकीची इतर साधने सुरु झाली आहेत. त्यामुळे मुंबई किंवा पुण्यातील लोकल आतापर्यंत सुरु व्हायला हवी होती. सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही असे दिसत आहे. त्यामुळे कोरोनानंतर फार मोठा बदल होईल, असे मला वाटत नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

एल्गार परिषदेवर प्रकाश आंबेडकर काय बोलले?

एल्गार परिषदेसंदर्भात (Elgar Parishad) काय निर्णय घ्यायचा ते आयोजक ठरवतील. मात्र, आमचे आणि पी बी सावंत यांचे जे उद्दिष्ट होते, ते पूर्ण झाले आहे. कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात आज बोलणं योग्य ठरणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारली तरी एल्गार परिषद घेऊच; तुरुंग, मरणाला घाबरत नाही: कोळसे-पाटील

अजित पवारांकडून भीमा-कोरेगाव युद्धातील शहीदांना अभिवादन, घरातूनच विजयस्तंभाला अभिवादन करण्याचं नागरिकांना आवाहन

एल्गार परिषद होणारच, बी जी कोळसे पाटलांची घोषणा, तारीखही जाहीर

(Prakash Ambedkar criticize central and state government)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.