Pune IMD : पुणेकरांना पाऊस भिजवणार! पुणे वेधशाळेनं काय वर्तवला अंदाज? वाचा सविस्तर
पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले, की पुण्यात या महिन्याच्या शेवटपर्यंत अंशतः ढगाळ हवामान कायम राहील. 27 एप्रिल आणि 28 एप्रिल रोजी पुणे शहरात हलक्या पावसाची (Rain) शक्यता आहे.
पुणे : मागील दोन दिवसांपासून विशेषत: रविवारी शहरातील दिवसाचे तापमान (Temperature) 37 अंशांच्या आसपास होते. तरी शहरात दमट आणि उष्ण वातावरण कायम आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार (IMD) दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा 1.1 अंश थंड होते. रविवारी शिवाजीनगर येथे नोंदवलेले रात्रीचे तापमान 25.3 अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा पाच अंशांनी जास्त होते, असेही IMDने नमूद केले आहे. पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले, की पुण्यात या महिन्याच्या शेवटपर्यंत अंशतः ढगाळ हवामान कायम राहील. 27 एप्रिल आणि 28 एप्रिल रोजी पुणे शहरात हलक्या पावसाची (Rain) शक्यता आहे. 30 एप्रिलपर्यंत आकाश ढगाळ राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले, की रविवारी कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात हलका पाऊस झाला.
पावसाची नोंद
कोल्हापूरमध्ये पावसाचे प्रमाण नोंदवले गेले आणि सोलापूरमध्ये रविवारी 0.2 मिमी पाऊस झाला. तर, कोकण आणि गोव्यातील रत्नागिरीतही रविवारी एक-मिलीमीटर पाऊस झाला. 25 एप्रिल ते महिन्याच्या अखेरीस मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळ आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. त्याचवेळी मध्य महाराष्ट्रातील उर्वरित भागात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती
कोकण, गोवा आणि मराठवाड्यात येत्या काही दिवसांत विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद होऊ शकते. महाराष्ट्रातील विदर्भात पुढील काही दिवसांत उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे 42.5 अंश सेल्सिअस होते. रविवारी महाराष्ट्रातील सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे 18.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.