कसबा, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपचे खलबते, बावनकुळेंचा बैठकांचा जोर

भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे ब्राम्हण समाज नाराज झाला आहे. हिंदू महासंघाचे आनंद दवे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्याचा परिणाम भाजपच्या मतांवर होणार आहे.

कसबा, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपचे खलबते, बावनकुळेंचा बैठकांचा जोर
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 12:46 PM

अभिजीत पोते, पुणे : पुणे कसबा पेठ विधानसभा (Pune Bypoll Election) पोटनिवडणुकीत भाजपसमोर महाविकास आघाडीने आव्हान उभं केलंय. यामुळे भाजपनं आपली सगळी ताकद पणाला लावलीय. भाजपचे दोन मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) हे 26 तारखेपर्यंत पुण्यात तळ ठोकून राहणार आहेत. बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिवसभर कसबा मतदारसंघात (Kasba Peth Assembly Constituency) आहेत. त्यांनी संघ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर महायुतीची बैठक सुरू झालीय.

भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे ब्राम्हण समाज नाराज झाला आहे. हिंदू महासंघाचे आनंद दवे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षाच्या मतांवर होणार आहे. कसबा पेठ येथे भाजपचे हेमंत रासने, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

कसबा पेठ हा मतदारसंघ 1978 पासून भाजपचा बालेकिल्ला आहे. परंतु ब्राम्हण समाज नाराज आहे. कारण टिळक परिवारात भाजपने उमेदवारी दिली नाही किंवा ब्राम्हण उमेदवारही दिला नाही. यामुळे दोन वेळा पोस्टर लावण्यात आले होते. त्यात आम्ही नोटाचे बटन दाबणार असल्याचे म्हटले होते. तसेच आनंद दवे यांच्यांमुळे ३० टक्के एकगठ्ठा भाजपची मते विभाजली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

संघ कार्यालयात बैठक

कसबा पेठेतील या परिस्थितीमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकांचे सत्र सुरु झाले. बुधवारी सकाळी संघ कार्यालयात ते गेले. त्यांनी संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी कसबा मतदार संघात एकंदरीत निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा झाली. या परिस्थितीचा फायदा काँग्रेस उमेदवाराला होऊ नये म्हणून रणनीती ठरवण्यात आली.

महायुतीची बैठक

बावनकुळे यांनी पुण्यातील संघाच्या कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर महायुतीची बैठक घेण्यात आली. त्यात शिंदे गट, आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत कसब्यातील प्रचार रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला आहे. भाजप नेत्यांनी मनसेच्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर मनसेने हा मोठा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी काल रुट मार्च केला. स्थानिक पोलीस आणि एसआरपीएफची तुकडीने हा रुट मार्च केला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.