मराठा आरक्षण द्या, पण या पद्धतीने चालणार नाही…छगन भुजबळ यांचा इशारा

chhagan bhujbal | मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देता येत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वच मराठ्यांना मागास म्हणता येणार नाही, हे अनेकवेळा स्पष्ट झाले. यामुळे सरसकट मराठा समाजास कुणबी दाखले देऊन ओबीसीतून आरक्षण देण्यास आपला विरोध आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण द्या, पण या पद्धतीने चालणार नाही...छगन भुजबळ यांचा इशारा
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 12:54 PM

प्रदीप कापसे, पुणे, दि. 27 नोव्हेंबर 2023 | मराठा आरक्षण देण्यास आपला विरोध नाही. परंतु मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देता येत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे ओबीसीतून मराठा समाजास आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे.  मराठा समाजास आरक्षण देण्यास माझा विरोध नाही. यासंदर्भात जेव्हा, जेव्हा ठराव आला, तेव्हा आपण हात वर केला आहे.  तसेच शिंदे समितीचे काम संपले आहे. आता ही समिती बरखास्त करा, अशी मागणी राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली.

शिंदे समितीचे काम संपले

शिंदे समिती बरखास्त करण्याच्या मागणीसंदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले की, मराठवाडा हा निजामांकडे होता. त्यामुळे मराठवाड्यातील लोकांनी मागणी केली की आम्ही मागसवर्गीय आहे. पण आमची कागदपत्रे तेलंगणात आहे. आता तेथील कागदपत्रे तपासली गेली. हा विषय फक्त मराठवाड्यापुरता होता. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हे काम करण्याची गरज नाही. आता राज्यात कुणबीसंदर्भात खोटे प्रमाणपत्र तयार केले जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. यामुळे शिंदे समितीचे काम आता संपले आहे. समिती बरखास्त करण्यात यावी.

पोलिसांवर हल्ले मग आपले काय

आपल्यावर हल्ले होत आहे? याप्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, माझ्यावर हल्ले झाले त्यापेक्षा पोलिसांवर हल्ले झाले, हे महत्वाचे आहे. महिला पोलीस जखमी झाल्या. सध्या पोलीस हातबल झाले आहे. कारण जखमी झाल्यावर कारवाई पोलिसांवरच करण्यात आली. यामुळे राज्यात पोलीसच सुरक्षित असतील तर इतरांचे काय? यामुळे आता पोलिसांना विश्वास देणे गरजेचे आहे. तुम्ही तुमचे काम करा, असे पोलिसांना सांगणे गरजेचे आहे. बीडमध्ये पोलिसांवर हल्ला कसा झाला, हे तपासण्याची गरज आहे. जनतेपुढे पहिली बाजू आली नाही. त्याला पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्री जबाबदार आहे.

संभाजी महाराज यांच्यासंदर्भात आपणास मोठा आदर आहे. त्यांचा पूर्ण महाराष्ट्र आहे. एखाद्या घटकाकडे त्यांनी पाहू नये, अशी आपली हात जोडून त्यांना विनंती आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.