Pune crime | पुण्यात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी ; नेमकं काय घडलं
या घटनेत जखमी झालेली मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत घराबाहेर खेळात असताना त्या परिसरातील भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. अचानक कुत्र्याने हल्ला केल्यानं घाबरलेली मुलगीने आरडाओरडा केला. तिच्या ओरडण्याचा आवाज एकूण एकून महिला धावत आली व कुत्र्याला हकलले
पुणे – शहरातील सातारा रोड परिसरातील (Satara road area)एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्याने ( stray dog) हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. यामुलीवर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. सकाळच्या वेळी ही घटना घडली आहे. या घटनेत जखमी झालेली मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत घराबाहेर खेळात असताना त्या परिसरातील भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. अचानक कुत्र्याने हल्ला केल्यानं घाबरलेली मुलगीने आरडाओरडा केला. तिच्या ओरडण्याचा आवाज एकूण एकून महिला धावत आली व कुत्र्याला हकलले. त्यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.याबाबत अनेकदा महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे.
महापालिकेचं दुर्लक्ष
शहरारातील वेगवेगळ्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या भटक्या कुत्र्यांकडून अनेकदा नागरिकांवर हल्ला करणे तसेच वाहनानांच्या मागे धावणे, टोळक्याने हल्ला केल्याची घटनाही सातत्याने घडत असतात. याबाबत अनेकदा महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे. महानगरपालिकेकडून मात्र कोणत्याही प्रकारची दाखल घेतली जात नाही.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
या घटनेनंतरतरी महानगरपालिका भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार का ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. महानगरपालिके लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. स्थानिक नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत.
सशस्त्र दरोड्यात एकाचा मृत्यू; कुटुंबियांना मारहाण करुन दागिने लंपास; सोलापूर जिल्ह्यातील घटना
Pimpari BJP Corporater Resigne | Pimpri Chinchwadमध्ये भाजपाची गळती सुरूच
GOLD RATE UPDATE: 54 हजारांचा टप्पा पार! मुंबईसह महाराष्ट्रात सोनं महागलं, जाणून घ्या- ताजे भाव