AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chitra Wagh | पूजा चव्हाणने उडी घेतलेल्या इमारतीत चित्रा वाघ, पुण्यात गॅलरीत जाऊन ऑन द स्पॉट पाहणी

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. Chitra Wagh visit Wanawadi

Chitra Wagh | पूजा चव्हाणने उडी घेतलेल्या इमारतीत चित्रा वाघ, पुण्यात गॅलरीत जाऊन ऑन द स्पॉट पाहणी
चित्रा वाघ, भाजप नेत्या
| Updated on: Feb 25, 2021 | 10:39 AM
Share

पुणे: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी अकरा वाजता सविस्तर बोलणार असल्याचं स्पष्ट केले. पूजा चव्हाण राहत होती तो फ्लॅट सील आहे. वरचे चार फ्लॅट आहेत ते बंद आहेत. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली आहे. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले गेले ? हे प्रश्न कायम आहेत. अकरा वाजता पत्रकारांशी बोलणार आहे, असं त्या म्हणाल्या. (Chitra Wagh visit building at Wanawadi Pune where Pooja Chavan suicide)

पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार

पूजा चव्हाणचा मृत्यू झाला त्या ठिकाणाची माहिती घेतली. भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी मदत केली. राठोडांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता मी अकरा वाजता सगळं बोलणार आहे, असं वाघ म्हणाल्या. चित्रा वाघ यांनी इमारतीची पाहणी करण्यापूर्वी पूजा चव्हाणच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. चित्रा वाघ  1 वाजता पुणे पोलीस आयुक्तांची देखील भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री राठोडांना मंत्रिमंडळातून हाकलून देतील

“मला आताही विश्वास आहे, मुख्यमंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात लक्ष घालतील. त्यांना ही संपूर्ण घटना माहिती आहे. ते वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतील. मुख्यमंत्री राठोड यांच्यासारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रीमंडळातून हाकलून देतील, असा अजूनपर्यंत विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित करताना दिली. यावेळी चित्रा वाघ राठोड यांच्या राजीनाम्यासाठी जास्त आक्रमक बघायला मिळाल्या.

“मंत्रिमंडळातल्या बाकी मंत्र्यांचं सोडून द्या, पण मुख्यमंत्र्यांची छवी ही चांगली आहे. महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे अतिशय संवदेनशील व्यक्तीमत्व म्हणून बघते. त्यामुळे ते राठोडांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे”, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील, असा विश्वास : चित्रा वाघ

भाजपने आधीच सुधीर मुनगंटीवारांकडे सर्व जबाबदारी दिली असती तर…? उदय सामंतांचं मोठं विधान

(Chitra Wagh visit Wanawadi Pune where Pooja Chavan suicide)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.