CNG rates hike : पुणेकरांना पंधरा दिवसांत दुसरा धक्का, सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या नवे दर
पुणेकरांसाठी मोठी बातमी आहे. पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ (CNG rates hike) करण्यात आली आले. सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आली होती.
पुणे : पुणेकरांसाठी मोठी बातमी आहे. पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ (CNG rates hike) करण्यात आली आले. सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात प्रति किलो मागे दोन रुपयांची वाढ करण्यात आल्याने पुणेकरांच्या (pune) खिशाला कात्री लागणार आहे. नव्या दरवाढीसह शहरात आता सीएनजीचे (CNG) दर प्रति किलो 75 रुपयांवर पोहोचले आहेत. पुण्यात 15 दिवसांपूर्वी सीएनजीचे दर प्रति किलो 68 रुपये इतके होते. त्यामध्ये पाच रुपयांची वाढ करण्यात आल्याने ते 73 रुपयांवर पोहोचले तर आता पुन्हा एकदा त्यामध्ये दोन रुपयांची वाढ करण्यात आल्याने पुण्यात सीएनजीचे दर प्रति किलो 75 रुपयांवर पोहोचले आहेत. सीएनजी वाढल्याने वाहतूक खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधीच महागाईचा भडका उडाला आहे, त्यात वाहतूक खर्च महाग होऊन इतर वस्तूंचे दर देखील वाढू शकतात. महागाईमुळे पुणेकर हैरान झाले आहेत.
व्हॅटमध्ये कपातीचा निर्णय
दरम्यान काही दिवसांपूर्वी वाढत्या सीएनजी, पीएनजीच्या किमती नियंत्रीत करण्यासाठी राज्य सरकारने व्हॅट कपातीचा निर्णय घेताला होता. सीएनजीवर साडेतेरा टक्के व्हॅट कपात केल्याने एक एप्रिलपासून सीएनजीचे दर सहा रुपयांनी तर पीएनजीचे दर साडेतीन रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र हा दिलासा फार काळ टिकला नाही. व्हॅट कपातीनंतर चौथ्याच दिवशी गॅस पुरवठा कंपन्यांकडून सीएनजी, पीएनजीचे दर वाढवण्यात आले. गेल्या पंधार दिवसांत दोनदा दरवाढ झाली आहे. याचा मोठा फटका हा ग्राहकांसोबतच टॅक्सीचालक आणि खासगी वाहनधारकांना बसणार आहे.
15 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर
एकीकडे आज पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे दिलासादायक बातमी म्हणजे पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या 15 दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र त्यापूर्वी 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलचे दर प्रति लिटर मागे दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढवण्यात आले आहेत. वाढत्या इंधनदराबाबत स्पष्टीकरण देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी राज्यांना व्हॅट कमी करण्याचा सल्ला दिला आहे.
संबंधित बातम्या
Share Market Updates : शेअर बाजार सुरू होताच सेंसेक्स वधारला, मात्र गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम