AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

lok sabha election | लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीपासून…राज्यातील मंत्र्याने केला दावा

lok sabha election 2024 | केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच पाच राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. या विधानसभा निवडणुकीस लोकसभेची सेमीफायनल म्हटले जात आहे. त्याचवेळी लोकसभेची चर्चा सुरु झालीय...

lok sabha election | लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीपासून...राज्यातील मंत्र्याने केला दावा
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 11:06 AM

सोलापूर | 17 ऑक्टोंबर 2023 : लोकसभेची निवडणूक 2024 मध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरु केली आहे. उमेदवारांच्या नावावर चर्चा सुरु झाली असून युती-आघाड्या निश्चित केल्या जात आहेत. राजकीय पक्षांची आपली तयारी सुरु केली आहे. त्याचवेळी केंद्रीय निवडणूक आयोगही तयारीला लागले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदविणे आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम ठरवून दिला आहे. आता या निवडणुका कधी जाहीर होणार? हा प्रश्न आहे. राज्यातील ज्येष्ठ मंत्र्याने यासंदर्भात उत्तर दिले आहे.

कधीपासून लागणार आचारसंहिता

लोकसभेची 2019 मध्ये 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान एकूण 7 टप्प्यांत निवडणूक झाली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी 30 मे रोजी शपथ घेतली होती. आता पुन्हा 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी जानेवारी 2024 अखेर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा दावा केला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता लागण्याचे वक्तव्य त्यांनी बैठकीत केली.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर येथे जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले की, सन 2023-24 अंतर्गत मंजूर निधीतील प्रस्तावित कामांची प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर द्या. कारण जानेवारी 2024 च्या अखेरीस लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. 2022-23 कालावधीतील निधी शिल्लक असल्यास ऑक्टोबर 2023 पर्यंत वर्क ऑर्डर देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला बैठकीत दिले.

हे सुद्धा वाचा

वार्षिक योजनांचा आढावा

सोलापूरचे पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या. यामुळे एकीकडे राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीस लागले असताना प्रशासनास आचारसंहिता सुरु होण्यापूर्वी विकास कामांचा निधी खर्च करण्याचे आदेश दिले जात आहेत. कारण आचारसंहिता लागल्यानंतर विकास कामे करता येत नाही. यामुळे राजकीय पक्षांनी दोन्ही पातळ्यांवर तयारी चालवली आहे.solapur

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.