Congress protest : देशात हिटलरशाही सुरू असल्याचा आरोप करत पुण्यात काँग्रेसचं आंदोलन; राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीचा निषेध

काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रात पुण्यामध्ये काँग्रेसकडून आज जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आंदोलनात सहभागी पुणे काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली.

Congress protest : देशात हिटलरशाही सुरू असल्याचा आरोप करत पुण्यात काँग्रेसचं आंदोलन; राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीचा निषेध
ईडी चौकशीला जात असताना राहुल गांधीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 2:26 PM

पुणे : पुण्यात काँग्रेसचे आज आंदोलन (Congress protest) होत आहे. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात पुण्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी कर्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन पाहायला मिळाले. राहुल गांधी यांची चौकशी सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राहुल गांधी यांनी सरकारच्या विरोधात आवाज उठवला, म्हणून ही कारवाई होत असल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे.नॅशनल हेराल्ड केस (National Herald case) प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. 13 जूनपासून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या प्रकृतीमुळे पुढचे तीन दिवस राहुल गांधी यांची चौकशी पुढे ढकलण्यात आली आहे.

केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्लीसह विविध राज्यात काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रात पुण्यामध्ये काँग्रेसकडून आज जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आंदोलनात सहभागी पुणे काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली. देशात हिटलरशाही सुरू आहे. घटनेनुसार कारभार होत नाही. राहुल गांधींना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. कोणताही घोटाळा नसून विनाकारण राहुल गांधींच्या मागे ससेमिरा लावला जात आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांकडून यावेळी करण्यात आला. प्रणिती शिंदे, विश्वजित कदम यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेस नेते आंदोलनात सहभागी झाले होते.

हे सुद्धा वाचा

तीन दिवस चौकशी नाही

सोनिया गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला. 12 जूनपासून त्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या आजारी असल्यामुळे ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही, अशी विनंती राहुल गांधी यांच्यातर्फे करण्यात आली होती. ईडीनेही ती मान्य केली आहे. गुरूवारी राहुल गांधी यांची ईडी चौकशी करण्यात आली, त्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या आईच्या प्रकृतीचे कारण देत नॅशनल हेराल्ड प्रकरणी सुरू असलेली चौकशी 17 जून ते 20 जून या कालावधीत पुढे ढकलण्याची विनंती ईडीला केली होती.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.