मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचं श्रेय घेण्यावरून पुणे भाजपमध्ये कुरघोडी, गौरव बापट म्हणाले…

पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला होता. मोहोळ यांच्या विजयाचं श्रेय घेण्यावरून पुणे भाजपमध्ये कुरघोडी होत असल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे सुपुत्र गौरव बापट यांनी खडेबोल सुनावले आहेत.

मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचं श्रेय घेण्यावरून पुणे भाजपमध्ये कुरघोडी, गौरव बापट म्हणाले...
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 4:55 PM

लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघात भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे आमदार रविंद्रं धंगेकर याचा पराभव केला होता. मात्र पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचं श्रेय घेण्यासाठी अंतर्गत कुरघोडी असल्याचं दिसत आहे. भाजपचे दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापट यांनी पुण्यात लागलेल्या बॅनरवर टीका करताना फेसबुक पोस्ट करत खडेबोल सुनावले आहेत.

गौरव बापट काय म्हणाले?

निवडणुका पार पडल्या. पुणे शहरातील सुज्ञ मतदारांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला. मुरलीधर मोहोळ खासदार झाले. अगदी लाखांच्या पुढे मताधिक्य मिळाले. परंतु या विजयात कोणी एकच वाटेकरी आहे, आणि माझ्यामुळेच कसे मताधिक्य मिळाले हे सांगण्याची अहमहमिका शहरातील काही भाजप नेते आणि काही व्यक्तीमध्ये सुरू आहे ते बघून वाईट वाटत असल्याचं गौरव बापट म्हणाले. या पोस्टची जोरदार चर्चा होऊ लागली असून त्यांचा कोणावर रोख होता का? अशी पोस्ट का केली? याबाबत टीव्ही9 मराठीला आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आजची फेसबुक पोस्ट केली त्यामागचा रोख हा कोणा एका व्यक्तीवर, गटावर किंवा संघटनेवर नाही. विजयाचं श्रेय लाटण्याच्या वृत्तीवर माझा रोख आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर पुणेकरांनी विश्वास दाखवला. विजय झाला आहे तो कार्यकर्त्यांचं आहे कारण या निवडणुकीसाठी भाजप आणि मित्रपक्ष शिवसैनिक, मनसे, पतीत पावन संघटन असे सगळे लोक एकत्रित काम करत होते. त्यामुळे हे श्रेय या मित्रपक्षांसह तळागातील कार्यकर्त्यांचं असल्याचं गौरव बापट म्हणाले.

दरम्यान, पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात गौरव बापट यांचे वडील गिरीश बापट हे दोनवेळा आमदार आणि एकदा खासदार होते. 29 मार्च 2023 मध्ये  गिरीश बापट यांचे पुण्यात दीर्घ आजारानंतर निधन झाले. कसबा मतदार संघात पोटनिवडुकीत त्यांनी आजारी असतानाही प्रचार केला होता. भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. यंदा पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यांच्याविरूद्ध रविंद्र धंगेकर यांनी निवडणुक लढवली होती. मोहोळ यांन या निवडणुकीत विजय मिळवल्यावर त्यांना केंद्राकडून राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.