Cylinder blast : गवळी वाडा परिसरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट; सुदैवानं जीवितहानी नाही

इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या मेसमध्ये आग (Fire) लागली. त्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी त्वरीत अग्निशामकला सकाळी 7.10च्या सुमारास फोन केला. दरम्यान, तत्परतेने आग विझवत तसेच कुलींग ऑपरेशन वेळेत केल्यामुळे आग अधिक प्रमाणात पसरली नाही. त्यामुळे संभाव्य धोका टळला.

Cylinder blast : गवळी वाडा परिसरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट; सुदैवानं जीवितहानी नाही
स्फोटानंतर खाक झालेले सिलिंडर आणि भोजनालय तसेच आग विझवताना अग्निशामक कर्मचारीImage Credit source: Express
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 11:17 AM

पुणे : गवळी वाडा परिसरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट (Cooking gas cylinder explosion) झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आग वरच्या मजल्यापर्यंत पसरू लागल्याने पुणे अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी चार अग्निशामक दल (Firebrigade) तैनात केले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे अग्निशामकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पुणे अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गवळीवाडा परिसरात हा प्रकार घडला. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या मेसमध्ये आग (Fire) लागली. त्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी त्वरीत अग्निशामकला सकाळी 7.10च्या सुमारास फोन केला. दरम्यान, तत्परतेने आग विझवत तसेच कुलींग ऑपरेशन वेळेत केल्यामुळे आग अधिक प्रमाणात पसरली नाही. त्यामुळे संभाव्य धोका टळला.

अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यात यश

अग्निशामक अधिकारी प्रशांत गायकर म्हणाले, की आम्ही पोहोचलो तोपर्यंत आग अधिक तीव्र झाली होती आणि वरच्या मजल्यावर पसरली होती. आम्ही 20 मिनिटांत आग आटोक्यात आणली. आग अधिक पसरू नये आणि संभाव्य हानी होऊ नये, म्हणून कुलिंग ऑपरेशन करण्यात आले. भोजनालयाच्या स्वयंपाकघरात स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर होते. एकाचा स्फोट झाला. त्यावेळी गोंधळ निर्माण झाला होता, असे येथील उपस्थितांनी सांगितले. यात अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी झालो. तिथे स्वयंपाकाच्या तेलाचे डबे भरले होते, तेही आम्ही बाहेर काढले. या आगीत भोजनालयाचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, असे गायकर यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

संभाव्य हानी टळली

ते पुढे म्हणाले, की आम्ही उरलेले गॅस सिलिंडर आणि तेलाचे कंटेनर बाहेर काढल्यामुळे संभाव्य हानी टळली. आम्ही शेजारच्या घरांचे आणखी गंभीर नुकसान आणि हानी त्यामुळे टाळू शकलो. भोजनालयाला कुलूप होते आणि वरच्या मजल्यावरील घरातील रहिवासी आम्ही पोहोचण्यापूर्वी वेळेत बाहेर पडू शकले. त्यामुळे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. इलेक्ट्रिक वायरिंग किंवा उपकरणांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली असावी, असे प्राथमिक निरीक्षणावरून दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.