पुण्यात ई-चलनचा दंड 77 कोटी, वसूल झाले फक्त 10 कोटी; तुमच्या वाहनावर दंड तर नाही ना?

पुण्यात (Pune) वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर ई-चलनच्या माध्यमातून दंड आकारला जात असला तरी दंड वसूल होण्याची प्रमाण मात्र कमी आहे. पुणेकरांच्या वाहनांवर अद्यापही कोट्यवधींचा दंड बाकी आहे.

पुण्यात ई-चलनचा दंड 77 कोटी, वसूल झाले फक्त 10 कोटी; तुमच्या वाहनावर दंड तर नाही ना?
(प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 4:21 PM

पुणे : पुण्यात (Pune) वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर (Traffic Rules Violation) ई-चलनच्या (E Challan) माध्यमातून दंड आकारला जातो. त्यासाठी शहरातल्या चौकाचौकात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ई-चलनच्या माध्यमातून दंड आकारला जात असला तरी दंड वसूल होण्याची प्रमाण मात्र कमी आहे. पुण्यात ई-चलनच्या माध्यमातून आतापर्यंत 77 कोटी 52 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात 10 कोटी 45 लाखांची दंडाची रक्कम वसूल झाली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या वाहनांवर अद्यापही कोट्यवधींचा दंड बाकी आहे. (corers of e-challan fines are due for violating traffic rules on Punekar’s vehicles)

दंड वसूल न होण्याची कारणं

ई-चलनचा मेसेज आल्यानंतर त्याकडे दु्र्लक्ष करणं हे दंड वसूल न होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. अनेकजण ई-चलनच्या मेसेजकडे दुर्लक्ष करत दंड भरण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे दंडाची रक्कम वाढत जात आहे. यासोबतच अनेकांच्या वाहनांना लिंक मोबाईल क्रमांक आणि सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक वेगळा आहे. त्यामुळे वाहनांनी नियम मोडल्यानंतर सध्या वापरात असलेल्या मोबाईलवर ई-चलनचा मेसेज जात नाही.

शिवाय काही जण बनावट नंबर प्लेट लावून वाहनं चालवत असल्याचंही समोर आलं आहे. अशा वाहनांनी नियम मोडले तर नंबर प्लेट असलेल्या मूळ मालकाच्या मोबाईलवर ई-चलनचा मेसेज जातो. त्यामुळे तो दंड भरला जात नाही. सोबतच वाहन विकल्यानंतर अनेकजण आरटीओमध्ये मोबाईल नंबर अपटेड करत नाही. त्यामुळे जुन्या वाहनमालकाला दंडाची पावती जाते.

तुमच्या वाहनावर दंड नाही ना?

पोलिसांनी एखादं वाहन पकडल्यानंतर त्याची तपासणी केली जाते. त्या वाहनावर किती दंड आहे हे पाहिलं जातं. त्यावेळी वाहनचालकांना वाहनावर जास्त दंड असल्याचं समजतं. मात्र, अशावेळी दंड भरण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे आपल्या वाहनावर किती दंड आहे याची खातजमा करत राहणं गरजेचं आहे. शिवाय ई-चलनचा मेसेज आल्यास तो लगेच भरल्यास दंडाची रक्कम साचून राहत नाही.

कसा आकारलं जातं ई-चलन?

शहरातल्या चौका-चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामाध्यमातून शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवलं जातं. हे काम वाहतूक शाखेच्या येरवडा इथल्या नियंत्रण कक्षातून चालतं. विना हेल्मेट गाडी चालवणं, सिग्नल तोडणे इ. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नजर ठेवली जाते. त्यानंतर त्यांचा फोटो काढून वेळ, ठिकाण यांची नोंद ठेवली जाते. ही माहिती मुंबईच्या नियंत्रण कक्षाला पाठवण्यात येते. तिथून नियम मोडणाऱ्या वाहन क्रमांकाच्या मालकाला ई-चलनचा मेसेज पाठवला जातो.

संबंधित बातम्या :

31 ऑगस्टपूर्वी कागदपत्रांची तपासणी करा, अन्यथा सदनिका रद्द! PMRDAचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा इशारा

पुणे महापालिकेच्या ‘अभय योजने’ला अत्यल्प प्रतिसाद, मुदत संपल्यावर होणार धडक कारवाई, कसा कराल अर्ज?

PMRDA विकास आराखड्यावर साडेआठ हजार हरकती दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मुदत, कशा दाखल कराल हरकती आणि सूचना?

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.