पुण्यात कोरोनाचा कहर, बेड हवाय तर काय करायचं?; इतर सुविधांसाठी प्रोसेस काय?

राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या प्रमुख शहरांममध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याने या शहरांमध्ये बेड्सची कमतरता भासत असल्याच्या तक्रारी येत आहेत. (corona cases rise in pune, know about medical facilities)

पुण्यात कोरोनाचा कहर, बेड हवाय तर काय करायचं?; इतर सुविधांसाठी प्रोसेस काय?
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 2:54 PM

मुंबई: राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या प्रमुख शहरांममध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याने या शहरांमध्ये बेड्सची कमतरता भासत असल्याच्या तक्रारी येत आहेत. बेड्सची कमतरता भासत असल्याने काय करावे हेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कळत नाही. बेड हवा असेल तर नेमकं काय करायचं?, त्याची काय प्रक्रिया आहे, याचा घेतलेला हा आढावा. (corona cases rise in pune, know about medical facilities)

पुण्यात सध्या किती रुग्ण?

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 2 लाख 83 जार 819 रुग्ण इतकी आहे. यापैकी 2 लाख 38 हजार 890 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात सध्या 39 हजार 518 सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत 5 हजार 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचा मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका आहे. शहरासह जिल्ह्याची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे.. त्यामुळे आता लसीकरण आणि कडक निर्बंध हाच त्यावर उपाय आहे.

दररोज 4 हजार रुग्णांची भर

पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात बेड्स कमी पडत आहेत. पुण्यात गेल्या 15 दिवसात दररोज चार हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठीच्या बेड्सची संख्या कमी झाली आहे. पुण्याच्या रुबी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे बेडची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्णालयाने तीन हॉटेल्स भाड्याने घेतल्या असून या ठिकाणी 180 बेड्स उलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुबी रुग्णालयाशिवाय पुण्याच्या सरकारी रुग्णालय आणि इतर रुग्णालयात बेडसची झपाट्याने कमतरता जाणवत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

टेस्ट कशी होते?

एखाद्या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षण जाणवली तर त्याला त्वरीत सेंटर फॉर डिसीज कंट्रोलमध्ये पाठवले जाते. त्याची कोविड चाचणी केली जाते.

कोणत्या प्रकारच्या टेस्ट होतात?

कोरोना रुग्णांच्या पाच प्रकारे टेस्ट केल्या जातात. स्वॅब टेस्ट, नेझल अॅस्पिरेट टेस्ट, ट्रेशल अस्पिरेट, सप्टम आणि रक्त चाचणी आदी टेस्ट केल्या जातात. या टेस्टमध्ये घेण्यात आलेले नमूने प्रयोगशाळेत पाठवले जातात. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर त्यानुसार उपचार केले जातात.

स्वॅब सेंटर

पुण्यात एकूण पाच झोनमध्ये स्वॅब संकलन केंद्र आहेत. झोन-1मध्ये टोले पाटील रस्ता, नगररोड-वडगावशेरी, झोन-2 मध्ये शिवाजीनगर-घोलेरोड, औंध-बाणेर, कोथरुड-बावधन, झोन-3 मध्ये वारजे-कर्वेनगर, सिंहगड रोड, धनकवडी-सहकारनगर, झोन-4मध्ये वानवडी-रामटेकडी, हडपसर-मुंढवा, कोंढवा-येवलेवाडी आणि झोन-5मध्ये भवानी पेठ, बिबवेवाडी आणि कसबा-विश्रामबागवाडा येथे हे स्वॅब सेंटर निर्माण करण्यात आले आहेत. याच ठिकाणी अँटिजेन टेस्टही केल्या जात आहेत.

लसीकरण केंद्र

पुण्यात 54 सरकारी रुग्णालये, दावाखान्यात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. हे सर्व सरकारी लसीकरण केंद्र आहेत. तर 65 खासगी दवाखान्यातही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

टेस्टसाठी रांगा, एका व्यक्तीला एक तास

कोरोना टेस्ट करण्यासाठी पुण्यात बऱ्यापैकी गर्दी असते. एका व्यक्तीमागे तासभर जात असल्याने ही गर्दी वाढत असते. त्यामुळे रुग्णांना गर्दीमध्ये तिष्ठत बसावं लागत असल्याचं चित्रं आहे.

80 टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, रिपोर्टसाठी दोन दिवस

अँटीजेन लगेच होते. आरटीपीसीआरचा रिपोर्ट यायला एक दिवस लागतो. रिपोर्ट येईपर्यंत 80 टक्के रुग्ण घरीच आहेत. ज्यांना लक्षणे नाहीत, त्रास नाही ते होम आयसोलेशनमध्ये आहे. अँटिजेनमध्ये लगेच कळतं पॉझिटीव्ह आहात की नाही. अँटिजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर आरटीपीसीआर चाचणी केली जाते. खासगीमध्ये गेला तर थेट आरटीपीसीआर करायचं सांगितलं तर ते आरटीपीसीआर चाचणी करतात. खासगीत थेट आरटीपीसीआर चाचणी केली जाते. आरटीपीसीआरचा रिपोर्ट यायला एक ते दोन दिवस लागतात.

फक्त खासगी लॅबची होम सर्व्हिस

टेस्ट घरी येऊनही केली जाते किंवा रुग्णालयात जाऊनही केली जाते. तुमच्यावर ते अवलंबून असतं. खासगी लॅबवाले घरीही येतात आणि चाचणी करतात. मात्र, घरी येण्याचा खर्च ते घेतात. सरकारी रुग्णालयातून कोणीही घरी येत नाही. तुम्हालाच टेस्टसाठी सरकारी रुग्णालयात जावं लागतं. फक्त खासगीवालेच होम सर्व्हिस देतात.

पुण्यात कॉल करताच बेडची माहिती

पुण्यात खाटांची कमतरता भासत असल्याने पुणे पालिकेने खाटांचं व्यवस्थापन सुरू केलं आहे. खासगी रुग्णालयांच्या खाटा ताब्यात घेतल्या जात असून हॉटेल्समध्येही रुग्णांची व्यवस्था करण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तिला कोरोनाची लागण झाली असेल आणि त्याला बेड्सची माहिती हवी असेल तर पुणे पालिकेने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. या नंबरवर कॉल केल्यास घर बसल्या बेड्सची माहिती मिळेत.

पुण्यातील बेड्ससाठी हेल्पलाईन

pune

pune

पुण्यातील खाटा व्यवस्थापन कक्षाचा हेल्पलाइन क्रमांक

020- 25502106 020- 25502107 020- 25502108 020- 25502109 020- 25502110

रुग्णवाहिका हवी असल्यास

9689939381 किंवा 108 9689939628 9011038148 020-245032211 020-245032212

पुण्यात रुग्णांना देण्यात आलेल्या बेड्सची स्थिती

>> एकूण बेड्स- 19381

>> ऑक्सिजन बेड्स – 8291

>> ऑक्सिजन विरहीत बेड्स – 8607

>> आयसीयू बेड्स व्हेंटिलेटर्स शिवाय – 1494

>> आयसीयू बेड्स व्हेंटिलेटर्ससह – 989

शिल्लक बेडची स्थिती

>> ऑक्सिजन बेड्स – 1194

>> ऑक्सिजन विरहीत बेड्स – 2140

>> आयसीयू बेड्स व्हेंटिलेटर्स शिवाय – 366

>> आयसीयू बेड्स व्हेंटिलेटर्ससह – 89

>> एकूण – 3789  (corona cases rise in pune, know about medical facilities)

अधिक माहितीसाठी पुणे पालिकेच्या या संकेतस्थळाला भेट द्या

https://divcommpunecovid.com/ccsbeddashboard/hsr

थोडक्यात महत्त्वाचे

>> पुण्यातील एकूण हॉटस्पॉट – 268

>> मोठे खाजगी हॉस्पिटल – दीनानाथ मंगेशकर, रुबी हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल

>> रेमेडेसीव्हर दर – रुपये 1500 ते 3000

>> पुणे जिल्ह्याचा एकूण मृत्यू दर- 1.8 (corona cases rise in pune, know about medical facilities)

संबंधित बातम्या:

दररोज 10 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा सविस्तर रिपोर्ट

Corona | मुंबईत कोरोनाचा हाहा:कार, दिवसभरात तब्बल 11,163 नवे रुग्ण, तर 25 रुग्णांचा मृत्यू, संपूर्ण शहराची परिस्थिती काय?

कोरोनाचा नवा स्ट्रेन गरोदर महिलांसाठी घातक, पिंपरीत जुळ्यांना जन्म दिलेल्या मातेला कोरोनाने हिरावलं!

(corona cases rise in pune, know about medical facilities)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.