Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढतायत, लॉकडाऊन लागणार? महापौर मोहोळ म्हणतात…

रुग्णसंख्या अशीच वाढली तर भविष्यात काही निर्बंध घालावे लागणार आहेत. असे स्पष्ट संकेत दिले आहेत. (pune mayor corona patient restrictions)

पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढतायत, लॉकडाऊन लागणार? महापौर मोहोळ म्हणतात...
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 7:25 PM

पुणे : राज्यात कोरोनाने(Corona) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरात तर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहाता येथील प्रशासन सतर्क झाले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनीसुद्धा पुण्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्णसंख्या अशीच वाढली तर भविष्यात काही निर्बंध घालावे लागणार आहेत, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. महारपौरांच्या या वक्तव्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला तर आगामी काळात पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का?, असे विचारले जाऊ लागले आहे. (corona patient increased in pune mayor said that some restrictions have to implement)

“पुण्यात कोरोनाचे रुग्ण व वाढत आहेत. रुग्णसंख्या जर अशीच वाढली तर भविष्यात काही निर्बंध घालावे लागतील. लग्न समारंभ किंवा सार्वजनिक कार्यक्रमांवर काही निर्बंध घालण्यासंदर्भात विचार सुरु आहे,” असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. तसेच पुढे बोलताना पुण्यात परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

पुण्यात कोरोनाचा स्फोट

राज्यात कोरोनाच्या संसर्गाची सुरुवात ही पुणे शहरातूनच झाली होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात येथे कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यानंतर येथील आरोग्य व्यवस्थेने अतोनात मेहनत करुन येथील कोरोना संसर्ग आटोक्यात आणला होता. मात्र, अनलॉक अंतर्गत निर्बंध शिथिल झाल्यानंतर येथे कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

कोरोना रुग्णांची काय स्थिती?

पुण्यात 11 फेब्रुवारी रोजी दिवसभरात 256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर दिवसभरात येथे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. 12 फेब्रुवारी रोजी दिवसभरात 258 नवे कोरोना रुग्ण वाढले होते. 13 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे रुग्ण वाढून दिवसभरात येथे 331 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर येथे एकूण अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 1558 वर पोहोचली होती. कोरोना रुग्णवाढीचा हा आलेख अजूनही चढाच आहे. काल म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे पुन्हा 309 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या पुण्यात 1719 नवे ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण झाले आहेत.

दरम्यान, येथे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना थोपवण्यासाठी अजित पवारांच्या निर्देशानुसार चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

Headline | 6 PM | गर्भपात केलेली पूजा अरुण राठोड कोण?

लॉकडाऊनमध्ये हजारो बालकांचा मृत्यू, शहरातील बाळांना जास्त धोका

पुणे आणि नागपुरात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट, लोकहो काळजी घ्या, नाहीतर…!

ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.