पुणे: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. या परिस्थितीत तरी लॉकडाऊन हा पर्याय नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
राजेश टोपे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. जिथे काही प्रॉब्लेम नाहीय तिकडे लॉकडाऊनचा विषय नाही. 40 टक्क्यांच्यावर बेड्स भरल्यानंतर लॉकडाऊनचा विचार करणार, मात्र आता तशी परिस्थिती नाही. आता 10 टक्केही बेड्स भरलेले नाहीत, असं टोपेंनी सांगितलं.
केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यमंत्री भारती पवार यांच्यासोबत आजच माझी बैठक होती. केंद्राने जो निधी दिलाय तो वेगळ्या गोष्टीसाठी खर्च होणार आहे, आणि तो वेळेत कसा खर्च होईल याकडे आमचं लक्ष आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात ज्या दिवशी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवसापासून कठोर निर्बंध लागू करावे, लागतील असा इशाराही त्यांनी दिला होता.
दरम्यान, राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 578 वर पोहोचली आहे. सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 259 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. सोमवारी राज्यात 12 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात 3 जानेवारीला ओमिक्रॉनचे 68 रुग्ण आढळले आहेत. मुंबई-40, पुणे-14 नागपूर- 4, पुणे ग्रामीण ,पनवेल प्रत्येकी 3 तर कोल्हापूर, नवी मुंबई, सातारा ,रायगड 1 रुग्ण, ही आजची आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 578 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 259 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामध्ये नव्या कोरोनाबाधिकांपैकी जवळपास 80 टक्के रुग्णांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. म्हणजेच लसीच्या दोन्ही मात्रा घेऊनही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण बरेच आहे. यामुळे लसीच्या प्रभाव क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. तसेच लस घेतली असली तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम म्हणजेच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, तसेच सॅनिटायझरचा वापर करणे याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/7JwexyS5J0#BreakingNews | #LiveUpdates | #Corona | #Omicron |
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 4, 2022
संबंधित बातम्या:
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची लागण; ताई काळजी घ्या, धनंजय मुंडे यांचा मेसेज