Pune Metro | पुणे शहरात लोकप्रिय ठरलेली मेट्रो महागली, काय आहेत कारणे

Pune Metro News | पुणे शहरात लोकप्रिय ठरलेली मेट्रो महाग झाली आहे. पुणे मेट्रोला प्रतिसाद वाढत असताना आता मेट्रोसाठी जास्त खर्च करावा लागणार आहे. पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा चांगला पर्याय मेट्रो ठरली होती.

Pune Metro | पुणे शहरात लोकप्रिय ठरलेली मेट्रो महागली, काय आहेत कारणे
Pune Metro
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 12:24 PM

पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहराचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात आहेत. पुणे शहरात मेट्रो सुरु होण्यापूर्वी सार्वजनिक वाहतुकीसाठी केवळ पीएमपीएमएलची बस हाच पर्याय होता. ऑगस्ट महिन्यात वनाज ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर हे मेट्रोचे दोन मार्ग सुरु झाले. त्यानंतर पुणे शहरातील नागरिकांनी मेट्रोला भरभरुन प्रतिसाद दिला. यामुळे मेट्रोचा विस्तार केला जात आहे. आता पुणे मेट्रो महाग झाल्याची बातमी आली आहे.

किती महाग झाली मेट्रो

पुणे मेट्रो तब्बल 2000 कोटींनी महाग झाली आहे. पुणे मेट्रोचा खर्च 11 हजार 400 कोटींवरून आता 13 हजार कोटींवर रुपयांवर गेला आहे. कोरोनामुळे मेट्रोच्या कामाला विलंब झाला होता. तसेच मेट्रोच्या जागेत करण्यात आलेला बदल, त्यामुळे भूसंपादनासाठी लागलेली जास्त रक्कम यामुळे मेट्रोचा खर्च सुमारे दोन हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. मेट्रोच्या या वाढलेल्या खर्चाला मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया आता सुरु करावी लागली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांनी एका बैठकीत ही माहिती दिली.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट प्रवास कधीपासून

मेट्रोचा पिंपरी-चिंचवडपासून शिवाजीनगरपर्यंत सुरु आहे. आता शिवाजीनगर ते स्वारगेट या टप्प्याचे काम वेगाने सुरु आहे. स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट हा मार्ग 5 किलोमीटर अंतराचा आहे. हा संपूर्ण मार्ग भूयारी आहे. हे काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडे ते स्वारगेट हा प्रवास मार्चनंतर मेट्रोने करण्यात येणार आहे. तसेच वनाज ते रामवाडी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. नुकतीच रुबी हॉल ते रामवाडी या मार्गाची चाचणी यशस्वी झाली आहे. हा मार्ग डिसेंबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

गणेश उत्सवात भरभरुन प्रतिसाद

पुणे मेट्रोला गणेश उत्सवात भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. गणेश भक्ताच्या सोयीसाठी मेट्रोची वेळ वाढवण्यात आली होती. विसर्जनाच्या दिवशी रात्री दोन वाजेपर्यंत मेट्रो सुरु होती. यामुळे मेट्रोच्या उत्पन्नात भर पडली.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.