स्मृती इराणींवर पुण्यात भ्याड हल्ला, पोलिसी कारवाई न झाल्यास जशास तसे उत्तर, फडणवीसांचा इशारा
पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, अशी आक्रमक भूमिका फडणवीसांनी मांडली आहे. स्मृती इराणींवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद दिल्ली दरबारीही उमटण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेImage Credit source: Twitter
पुणे– पुण्यात स्मृती इराणींवर (Smruti Irani) झालेला हल्ला हा भ्याड हल्ला होता असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis)यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते (NCP workers)गृहमंत्री आपले आहेत अशा भावनेत रोज कायदा हातात घेऊन बेकायदेशीर कृत्य करतायत, सत्तापक्षाचे कार्यकर्ते अशा प्रकारचं कृत्य करू लागले तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था नाही हे स्पष्ट दिसतंय, असं सांगत त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आम्हीही जशास तसं उत्तर देऊ शकतो पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत, पोलिसांना कारवाईची संधी देत आहोत असेही त्यांनी सांगितले.
Joined inaugural of Marathi edition of book on @AmitShah Ji ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ in Pune. Today, Amit Shah Ji has become an institution in himself on how to passionately serve the Sangathan for the cause of Nationalism. https://t.co/b7jdCsxtC5
राज्यात दररोज सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या घटनांबाबत फडणवीसांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, अशी आक्रमक भूमिका फडणवीसांनी मांडली आहे. स्मृती इराणींवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद दिल्ली दरबारीही उमटण्याची शक्यता आहे.
पुण्यात नेमकं काय घडलं.
पुण्यात स्मृती इराणी अमित शाहा यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्या ज्या हटेलबाहेर थांबल्या होत्या, त्या हॉटेलच्या बाहेर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी काही काळ भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामनेही आले होते.
कार्यक्रमातही गोँधळ
बालगंधर्वमध्ये कार्यक्रम सुरु असताना काही राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी गोँधळ घालण्याचा प्रयत्न केला, पोलीस त्यांना पकडून नेत असताना त्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर परततताना स्मृती इराणी यांच्या गाडीवर अंडी फेकण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
अजित पवार, सु्प्रिया सुळेंनीही घेतली माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणाची माहिती फोनवरुन घेतली. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना फोन करुन त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या महाराणी वर खासदार सुप्रिया सुळे यांनी केला निषेध व्यक्त केला आहे. यासंदर्भात अजित पवार यांच्याशी देखील फोनवरून संभाषण झाले असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. या घटनेचा सखोल तपास करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील सुळे यांनी केली आहे.