Pune : जमीन संपादनाला विरोध केला म्हणून शेतकऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

पुणे रिंग रोड (Pune ring road) आणि पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (Nashik high speed railway) जमीन संपादनाच्या विरोधात शेतकरी (Farmers) आक्रमक झाले आहेत. विरोध तीव्र असल्याने शेतकऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : जमीन संपादनाला विरोध केला म्हणून शेतकऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा
जमीन संपादनास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 10:07 AM

पुणे : पुणे रिंग रोड (Pune ring road) आणि पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (Nashik high speed railway) जमीन संपादनाच्या विरोधात शेतकरी (Farmers) आक्रमक झाले आहेत. विरोध तीव्र असल्याने शेतकऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 24 जणांना खेड पोलिसांनी अटक केली आहे. यात 12 महिलांचाही समावेश आहे. पुणे रिंग रोड आणि पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या जमीन संपादनाला तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाचा विरोध करत खेड तालुक्यातील 12 गावच्या शेतकऱ्यांसह महिलांनी खेड उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढला, बागायती जमिनी वगळून तसेच जमिनीला योग्य बाजारभाव मिळाला तरच जमिनीची मोजणी करावी, या मागणीसाठी चार तासांच्या मोर्चात शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात आपला मोर्चा काढला.

शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

राजगुरुनगर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांची धरपकड करत लाठीमार केला. यामध्ये 24 शेतकऱ्यांसह महिलांना अटक करण्यात आली आहे. याबरोबरच आंदोलकांवर शासकीय कामात अडथळा आणल़्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सुरुवातीपासूनच विरोध

आळंदी, चिंबळी, मोई, मरकळ परिसरातील शेतकरी भूमिहिन होत असताना तुटपुंज्या शेतीवर प्रकल्प कशासाठी, असा सवाल या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच केला आहे. ‘पुणे नाशिक रेल्वे, रिंग रोड हटावा शेतकरी बचाव’ असा नारा देत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आंदोलनही पुकारले होते. रक्त सांडले तरी प्रकल्पाला जमिनी देणार नाही, अशी भूमिका आंदोलक घेत आहेत.

आणखी वाचा :

दिघीत सापडले तब्बल 12 डुक्कर बॉम्ब! दोन महिन्यापूर्वी बालिकेचा झाला होता मृत्यू

Real Estate : रिअल इस्टेटला बूस्टर, घर विक्रीत 83 टक्क्यांनी वाढ; मुंबईत दुप्पटीनं खरेदी

Bombay High Court : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भरती ! शैक्षणिक पात्रता, शेवटची तारीख, एका क्लिकवर

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...