AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Cyclists : सायकल ट्रॅकची पुण्यात दैना; महापालिकेचं वाहतूक व्यवस्थेकडे बोट तर सायकलस्वारांना वाटतंय असुरक्षित!

प्रचंड रहदारी आणि सायकलस्वारांची होणारी अवहेलना यामुळे आम्हा लोकांसाठी सायकलवर जाणे एक परीक्षा ठरते. रस्त्यांची पायाभूत सुविधा निश्चितच खराब आहे आणि सायकल ट्रॅकवर अनेकदा दुचाकीस्वार किंवा विक्रेते अतिक्रमण करतात, असे सायकलस्वारांचे मत आहे.

Pune Cyclists : सायकल ट्रॅकची पुण्यात दैना; महापालिकेचं वाहतूक व्यवस्थेकडे बोट तर सायकलस्वारांना वाटतंय असुरक्षित!
पुणे सायकल ट्रॅक (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: Express
| Updated on: Jun 20, 2022 | 7:30 AM
Share

पुणे : असुरक्षित रस्त्यांची परिस्थिती आणि वेगाने होणारी वाहतूक यामुळे पुण्यातील रस्त्यावर सायकलस्वारांच्या (Pune Cyclists) अपघातांची संख्या वाढत आहे. या जीवघेण्या अपघातांची संख्या 2021मध्ये चार वर्षांपेक्षा जास्त झाली होती. पिंपरी चिंचवडमध्येही, सायकल चालविणाऱ्यांना काहीशा अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्याठिकाणी मृतांची संख्या कमी आहे. दोन्ही पोलीस आयुक्तालयातील (Commissionerate of Police) आकडेवारून हे लक्षात येते. पुणे वाहतूक पोलिसांनी 2022मध्ये (मे पर्यंत) प्रदान केलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे, की शहरात सायकलस्वारांसह पाच अपघातांची नोंद झाली आहे, ज्यामुळे तीन मृत्यू झाले आहेत. शहरातील रस्त्यांवर सुमारे 43 लाख वाहने धावतात, ज्यात दरवर्षी 3 ते 3.5 लाख नवीन वाहनांची भर पडत आहे. गेल्या वर्षी शहराच्या आयुक्तालयाच्या हद्दीत लोणी काळभोर आदी भाग जोडले गेले. ज्यामुळे रेकॉर्डमध्ये अपघातांची (Accident) संख्यादेखील वाढू शकते.

वाहनांची संख्या वाढली, रस्त्यांची मात्र…

वाहनांची संख्या वाढती असूनही रस्त्याची रुंदी मात्र तशीच आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतूनही जीवघेण्या अपघातांची नोंद झाली असली, तरी तेथील रस्ते जास्त रुंद असल्याने पुणे पोलीस आयुक्तालयाच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. काही अपवाद वगळता, सायकलस्वारांचा समावेश असलेले बहुतेक प्राणघातक अपघात तळेगाव दाभाडे आणि चाकणसारख्या बाहेरील भागात झाले आहेत. याठिकाणी रस्ते अरुंद आहेत आणि अवजड वाहनांची संख्या जास्त आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारत नाही, तोपर्यंत…’

पुणे महानगरपालिकेकडे एक समर्पित सायकल क्लब आहे आणि सायकलस्वारांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि त्यांची देखभाल करणे ही जबाबदारी पार पाडते. पीएमसीच्या रस्ते विभागातील अभियंत्यांच्या मते, जड वाहतुकीपासून वाचू इच्छिणाऱ्या दुचाकीस्वारांनी सायकल ट्रॅकवर अतिक्रमण केले आहे. सायकलस्वारांसाठी 100 किमी समर्पित मार्ग तयार करण्याची आमची योजना होती, त्यापैकी 20-30 किमी कार्यान्वित करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस आणखी 6 किमी जोडण्याचा आमचा मानस आहे. जोपर्यंत एकूण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारत नाही, तोपर्यंत सायकलस्वारांना शहरातील रस्त्यांवर चालवणे अवघड आहे.

‘सायकलट्रॅकवर दुचाकीस्वार, विक्रेत्यांचे अतिक्रमण’

सायकलस्वार तर अत्यंत नाराज आहेत. हडपसरमधील एका सायकलस्वाराच्या मते, आम्ही फक्त पहाटेच्या वेळेतच सायकलचा वापर शांततेने करू शकतो, त्यानंतर प्रचंड रहदारी आणि सायकलस्वारांची होणारी अवहेलना यामुळे आम्हा लोकांसाठी सायकलवर जाणे एक परीक्षा ठरते. रस्त्यांची पायाभूत सुविधा निश्चितच खराब आहे आणि सायकल ट्रॅकवर अनेकदा दुचाकीस्वार किंवा विक्रेते अतिक्रमण करतात.

‘सायकल चालवायला असुरक्षित वाटते’

महिला सायकलपटूंच्या मते, एकंदरीत अनुभव छान असला, तरी आम्हाला फक्त केरळमध्येच सायकल फ्रेंडली रस्ते सापडले. नवले पुलाजवळील माझ्या घरापासून कॅम्पमधील माझ्या कार्यालयात जाण्यासाठी मी सायकल वापरते. मात्र प्रचंड रहदारीमुळे मला भीती वाटते. रॅश ड्रायव्हिंग आणि खराब ट्रॅफिक यामुळे सायकलस्वार असुरक्षित आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.