Pune crime : सीमाशुल्क विभागानं दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून जप्त केलं 26.45 लाखांचं सोनं; पुणे विमानतळावर कारवाई
दुबईवरून आलेल्या दोन्ही प्रवाशाकडून सर्व सोने जप्त करण्यात आले असून, संबंधित दोघांनाही सीमा शुल्क कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.
पुणे : पुणे विमानतळावर(Pune Airport) दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 26.45 लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात पुण्यात दुबईहून कच्च्या सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. दुबईहून (Dubai) स्पाइस जेटच्या फ्लाइटने आलेल्या दोघा प्रवाशांना रोखले आहे. त्यांची अधिक तपासणी केली असता, त्यांच्याकडे कच्च्या सोन्याच्या बांगड्या आणि चैनीच्या रूपात 500 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे म्हणजेच 26.45 लाख रुपये किंमतीचे तस्करी केलेले सोने आढळून आले आहे. या प्रवाशांकडून सर्व सोने जप्त करण्यात आले असून, संबंधित दोघांनाही सीमा शुल्क (Customs department) कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. दोन्हीही महिला आहे. एक प्रवास तर दुसरी तिला घेण्यासाठी विमानतळावर आली होती. पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत, अशी माहिती सीमाशुल्कतर्फे देण्यात आली.
दोन महिला प्रवासी
जवळपास 26 लाख रुपयांच्या 500 ग्रॅम सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात दुबईहून आलेल्या या प्रवाशाला अटक झाली आहे. 34 वर्षीय महिला प्रवाशाला पुणे कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली. प्राथमिक चौकशीनंतर, पोलिसांनी विमानतळावर तिला घेण्यासाठी आलेल्या आणखी एका महिलेला (32) अटक केली आहे.
सीमा शुल्क कायद्यान्वये अटक
प्रोफाइलिंगच्या आधारे, विभागाने 5 मे रोजी दुबईहून स्पाईसजेटच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखले. तपशीलवार तपासणी केल्यावर असे आढळून आले, की प्रवाशाने 500 ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट सोन्याची तस्करी केली होती, कच्च्या सोन्याच्या बांगड्या आणि चैनीच्या रूपात 500 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे म्हणजेच 26.45 लाख रुपये किंमतीचे हे सोने असल्याचे समोर आले. कच्च्या बांगड्या आणि चेनच्या रूपात ही तस्करी होत होती. प्रवाशाकडून हे सोने जप्त करण्यात आले असून, विमानतळावर तिला रिसीव्ह करण्यासाठी आलेला प्रवासी आणि साथीदार या दोघांनाही सीमा शुल्क कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ कस्टम अधिकाऱ्याने दिली.
मागील महिन्यात जप्त केले होते जिवंत प्रवाळ
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 5 एप्रिल रोजी दोन प्रवाशांना अडवले. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये 466 जिवंत प्रवाळ आढळून आले होते. विशेष म्हणजे हे प्रवासीदेखील दुबईहूनच आले होते. त्यांना सीमाशुल्क विभागाने अटक केली होती.