Monsoon Update : बिपरजॉय चक्रीवादळ आज रौद्ररूप दाखवणार, कोकण किनारपट्टीवर मान्सूनची चिन्हे
Monsoon and cyclone : बिपोरजॉय चक्रीवादळ शनिवारी रौद्ररुप दाखवणार आहे. मुंबई अन् कोकण किनारपट्टीवर त्याचे परिणाम दिसणार आहे. दुसरीकडे कोकणात मान्सून येण्याची चिन्ह दिसू लागलीय. कोकण किनारपट्टीवर बदल होत आहे.
पुणे, रत्नागिरी : मान्सूनने केरळमध्ये हजेरी लावली आहे. मान्सूनने आपली वाटचाल पुढे सुरु केली आहे. आता कधीही मान्सून केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये दाखल होणार आहे. त्याचवेळी दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळ आज त्याचे भीषण रूप दाखवणार आहे. हे चक्रीवादळ पुढच्या २४ तासांत अत्यंत तीव्र होणार आहे. यामुळे मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी अलर्ट जारी केला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ सध्या मुंबईपासून 630 किलोमीटरवर अंतरावर आहे.
बिपरजॉयचा काय परिणाम होणार
बिपरजॉय चक्रीवादळामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळच्या किनारी भागात जोरदार वारे वाहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच किनारपट्टीवर पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. IMD ने मच्छिमारांसाठी इशारा दिला आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये मोठ्या लाटा उसळतील तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या किनारपट्टीवरती वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
10/6:?Very Severe Cyclonic Storm Biparjoy ovr EC Arabian Sea at 0530 hrs of today,abt 700km W of Goa,630km W-SW of Mumbai,620km S-SW of Porbandar,930km S of Karachi.Very likly to intensify further& move N-NEward gradually 24hrs.Then wuld move gradually N-NWward in subseq 3 days pic.twitter.com/RW6KwCtrAx
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 10, 2023
कोकणात मान्सूनची चिन्ह
मान्सूनची सर्वच जण चातकाप्रमाणे वाट पहातायत. कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रीय होण्याची चिन्ह दिसू लागली आहे. मान्सून महाराष्ट्रात कधी सक्रीय होणार याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जातो. पण मान्सून सक्रीय कधी होणार? पाऊस कधी येणार? याचे अचूक ठोकताळे किनारपट्टीवरचा मच्छिमार सुद्धा बांधत असतात. सध्या कोकण किनारपट्टीवर निसर्ग बदललाय सुरवात झालीय आहे. त्यामुळे मान्सून सक्रीय होणार आहे.
काय आहे चिन्ह
कोकण किनारपट्टी भागात माती मिश्रित फेणी म्हणजे फेसाचे पाणी येवू लागलंय. बिपरजॉय या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर ही फेणी रत्नागिरीच्या किनाऱ्यावर पहायला मिळतेय. तर दक्षिणेकडून वाऱ्याचे प्रमाण देखील वाढलंय. याच गणितांच्या आधारावर मान्सून ४ ते ५ दिवसात सक्रीय होईल, असे म्हटले जात आहे.
मान्सूनचे काय आहेत निकष
- केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हवामान खात्याची 14 स्टेशन आहेत. 10 मे नंतर या स्थानकांवर सलग दोन दिवस किमान 2.5 मिमी पाऊस झाला, तर मान्सून दाखल झाल्याचे मानले जाते. ही 14 स्थानके आहेत- मिनिकॉय, अमिनी, तिरुवनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अलाप्पुझा, कोट्टायम, कोची, त्रिशूर, कोझिकोड, थलासेरी, कन्नूर, केसरगोड आणि मंगळुरू.
- वेस्टर्न डिस्टर्बन्समध्ये हवेचा दाब 600 हेक्टोपास्कल असावा. म्हणजे वारे कमी उंचीवरुन वाहायला हवेत. त्याची दिशा विषुववृत्ताच्या उत्तरेकडे हवी. ही वारे मान्सूनला भारताकडे खेचतात. मान्सूनला ढकलणारा वारा 5 ते 10 अंश उत्तर अक्षांश आणि 70-80 अंश रेखांश असावा. त्याचा वेग ताशी 28 ते 37 किलोमीटर असावा.
- उपग्रहाकडून प्राप्त झालेल्या डेटामध्ये ओएलआर मूल्य (पृथ्वीचा पृष्ठभाग, महासागर आणि वातावरणातून किती उष्णता सोडली जात आहे) 200 डब्ल्यू प्रति चौरस मीटरपेक्षा कमी असावा. त्याची दिशा 5 ते 10 असावी. ते उत्तरेकडे आणि 70 ते 75 अंश पूर्वेकडे असावे.