MPSC पास दर्शना अन् राहुल यांच्या लग्नास कोणी दिला नकार? पोलीस चौकशीतून आली माहिती समोर

MPSC Pune Darshana Pawar : एमपीएससी परीक्षेत यश मिळालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येसंदर्भात मोठा खुलासा समोर आला आहे. राहुल हंडोरे याने दर्शनाची हत्या लग्न न केल्यामुळे केली. परंतु या लग्नास नकार कोणी दिला? हे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.

MPSC पास दर्शना अन् राहुल यांच्या लग्नास कोणी दिला नकार? पोलीस चौकशीतून आली माहिती समोर
Darshana PawarImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 1:47 PM

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वनअधिकारी पदाची परीक्षा दर्शना पवार उत्तीर्ण झाली होती. लवकरच ती महाराष्ट्र शासनाच्या सेवेत दाखल होणार होती. परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते. शासनाच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी तिची हत्या झाली. तिची हत्या तिचा मित्र असणारा राहुल हंडोरे यानेच केली. ही हत्या दर्शना हिने राहुल याच्याशी लग्न करण्यास नकार दिल्यामुळे केली, हे स्पष्ट झाले आहे. परंतु या लग्नास नकार कोणी दिला? हे समोर आले आहे. पोलीस चौकशीतून ही माहिती राहुल हंडोरे याने दिली आहे.

कोणी दिला लग्नास नकार

दर्शना पवार अन् राहुल हंडोरे दोन्ही जण एमपीएससी परीक्षेची तयारी करत होते. त्यात राहुल हंडोरे याला यश मिळाले नाही. परंतु दर्शना पवार परीक्षा उत्तीर्ण झाली. ती महाराष्ट्र शासनाच्या सेवेत दाखल होणार होती. त्यापूर्वीच १२ जून रोजी तिची हत्या झाली. राहुल हंडोरो यानेच ही हत्या केली. हत्येचे कारण राहुल याने पोलिसांना सांगितले. दर्शनाशी लग्न करण्याची राहुल याची इच्छा होती. परंतु या लग्नास दर्शना हिनेच नकार दिला. त्यामुळेच राहुल याने दर्शनाची हत्या केली. म्हणजे दर्शना अन् राहुल यांच्या लग्नाचा विषय दर्शनाच्या घरापर्यंत गेलाच नव्हता.

कशी केली होती हत्या

दर्शना हिने राहुल याला लग्नास नकार दिला होता. त्यानंतर ११ जून रोजी दर्शनाचा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे सत्कार होता. या समारंभात दर्शना हिने आपली यशोगाथा सांगणारे स्फूर्तीदायक भाषण केले. तिच्या त्या शेवटच्या भाषणाची चर्चाही चांगली झाली. त्यानंतर १२ जून रोजी राहुल याने दर्शनाला राजगडावर फिरण्यासाठी येण्याचा आग्रह धरला. दोघे मित्र असल्यामुळे दर्शना तयार झाली.

हे सुद्धा वाचा

12 जूनला सकाळी राजगड किल्ला चढण्यासाठी दोन्ही जण पोहचले. दर्शना अन् राहुल किल्ल्याच्या पायथ्याशी असल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर दोन्ही जण राजगडावर जाताना दिसत होते. मात्र त्यानंतर सकाळी 10 वाजता राहुल हंडोरे हा एकटाच परतला. त्याच्यासोबत दर्शना नव्हती. त्यामुळे ही हत्या त्यानेच केल्याचे स्पष्ट झाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.