पुण्यातील सर्व वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी, हाय सिक्युरिटी नंबर प्लेटबाबत महत्वाचा निर्णय
High-Security Registration Plates in pune: वाहनधारकांना transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने एचएसआरटी नंबर प्लेटसाठी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करुन तुमचे नजीकचे सेंटर निवडावे लागेल.

HSRP Number Plate: राज्यातील सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2019 च्या पूर्वीच्या सर्व प्रकारच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. एचएसआरटी नंबर प्लेट शिवाय वाहन आढळले तर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई आणि दंड करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य परिवहन विभागाने 31 मार्चपर्यंत मुदत दिली होती. परंतु आता पुणेकरांना दिलासा दिला आहे. मुदत वाढवली आहे. आता 30 एप्रिल 2025 पूर्वी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवावी लागणार आहे.
यामुळे पुण्यात वाढवली मुदत
पुणे जिल्ह्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आता 30 एप्रिल 2025 पूर्वी एचएसआरपी बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. पुण्यातील वाहन संख्या पाहिल्यावर 25 लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. त्यासाठी एका कंपनीला काम देण्यात आले आहे. या कंपनीने ही नंबरप्लेट बसवण्यास सुरुवात केली आहे. परंतु आतापर्यत केवळ पंधरा हजार जणांनी नंबर प्लेटसाठी अर्ज केले आहे. त्यातील सात ते आठ हजार वाहनांना ही नंबरप्लेट बसवण्यात आली आहे.




एचएसआरटी नंबर प्लेटची किंमत काय?
- मोटर सायकल आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये + जीएसटी
- थ्री व्हीलरसाठी 500 रुपये + जीएसटी
- फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी 745 रुपये + जीएसटी
एचएसआरटी नंबर प्लेट कशी मिळेल?
transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने एचएसआरटी नंबर प्लेटसाठी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करुन तुमचे नजीकचे सेंटर निवडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तारीख मिळेल. त्या तारखेला फिटमेंट सेंटरला जा. तिथे गेल्यावर वेंडर तुमच्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देईल. नंबर प्लेट बसवून त्याची नोंद वेंडर वाहन प्रणालीत करणार आहे.
तर एचएसआरटी नंबर प्लेट दिसेल पेंडींग
एचएसआरटी नंबर प्लेट अधिकृत वेंडरकडून बसवून घ्यावी. कोणी एचएसआरपीसारखी दिसणारी नंबर प्लेट बसवली तर त्याची नोंद वाहन प्रणालीत होणार नाही. त्यामुळे वाहन प्रणालीत तुमची एचएसआरटी नंबर प्लेट पेंडींग दिसेल.