Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार की शरद पवार? पुणे शहर राष्ट्रवादीने घेतला निर्णय

Ajit Pawar and Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले. त्यानंतर अनेक ठिकाणी दोन गट निर्माण झाले. कोणाबरोबर जावे, यावर बैठका सुरु आहेत. आता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला निर्णय घेतला आहे.

अजित पवार की शरद पवार? पुणे शहर राष्ट्रवादीने घेतला निर्णय
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 2:53 PM

योगेश बोरसे, पुणे : राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी दोन गट तयार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. त्यानंतर आपल्या गटातील काही आमदारांसह ते राजभवनावर पोहचले. अजित पवार यांच्यासोबत नऊ जण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या घडामोडीनंतर शरद पवार मैदानात उतरले. त्यांनी राज्याचा दौरा करुन पक्षबांधणी करण्याची घोषणा केली. त्यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत कोणत्या गटात जावे? यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

काय घेतला निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पक्षात फूट पाडणाऱ्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निषेध करण्यात आला. तसेच या काळात शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा शहर कार्यकारीणीत ठराव करण्यात आला. आपण सगळे पवार साहेबांसोबत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

मुंबईतील बैठकीला जाणार

राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश बैठक मुंबईत ५ जुलै रोजी होणार आहे. या बैठकीला आपण जाणार आहोत. सकाळी १० पर्यत मुंबईत पोहचा अन् पुणे शहर पवार यांच्यासोबत आहे, हे दाखवून द्या, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले. आपण कायदेशीर लढाई लढत आहोत. त्यामुळे प्रतीज्ञापत्र आलेले आहेत, ते घेऊन जा, असे प्रशांत जगताप यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांच्यावर टीका नको

अजित पवार किंवा इतर नेत्यावर कुठलेही आरोप किंवा टीका करू नका. सुप्रिया सुळे यांनीही आपल्या वक्तव्यात टीका केली नाही. सोशल मिडियावरून आपल्या काही संदेश द्यायचे असतील तर ते अधिकृतरित्या पाठवण्यात येतील. यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

बैठकीला २३ माजी नगरसेवक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत 23 माजी नगरसेवक उपस्थित होते. पुणे येथील राष्ट्रवादीचे कार्यालयाचा करार माझ्या नावाने आहे, त्यामुळे कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रश्नच येत नाही. कार्यालयाचा ताबा कुणी घेणार नाही, घेतला तर मला पोलीस तक्रार देण्याचा अधिकार आहे, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले. कार्यालयातील अजित पवार यांचा फोटो हटवण्यासंदर्भात जयंत पाटील ज्या सूचना देतील, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.