…अन्यथा होणार थेट पोलीस कारवाई; देहूनगरीत मांस विक्री आणि नदीतील मासे पकडण्यावर बंदी
श्रीक्षेत्र देहू (Dehu) नगरीत मांस, मच्छी विक्री आणि इंद्रायणी (Indrayani) नदीतील मासे पकडण्यास बंदी (Ban) घालण्यात आली आहे. तसा ठराव फेब्रुवारी महिन्यात झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड : श्रीक्षेत्र देहू (Dehu) नगरीत मांस, मच्छी विक्री आणि इंद्रायणी (Indrayani) नदीतील मासे पकडण्यास बंदी (Ban) घालण्यात आली आहे. तसा ठराव फेब्रुवारी महिन्यात झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून देहू नगरीमध्ये ही अंमलबजावणी सुरू झाली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट पोलीस कारवाई होणार आहे. देहू हे तीर्थक्षेत्र असून, लाखो वारकरी देहूत दाखल होऊन संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेत असतात. वारकरी परंपरा आणि तीर्थक्षेत्र असल्याने देहूत अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याआधी देहू ग्रामपंचायत असतानाही त्याची अंमलबजावणी सुरू होती. त्यानंतर नवनिर्मित देहू नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्व साधारण सभेत हा निर्णय घेतला. त्यामुळे आता देहूनगरी शुद्ध शाकाहारी बनली आहे.
प्रशासक असताना सुरू झाली होती मांस, मच्छी विक्री
जानेवारीत एकमुखाने मंजुरी दिलेल्या ठरावाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. याआधी ग्रामपंचायतीनेसुद्धा हा निर्णय घेतला होता. मात्र ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि कोरोनाचाही काळ सुरू झाला. त्यामुळे प्रशासक असताना मांस, मच्छी विक्री सुरू झाली.
#pune : श्रीक्षेत्र देहू नगरीत मांस विक्री आणि इंद्रायणी नदीतील मासे पकडण्यास बंदी घालण्यात आली. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी याबाबत माहिती दिली.#dehu #vegetarian #Temple अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/wBrwZdZSRI
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 1, 2022
देहू संस्थांनकडून निर्णयाचे स्वागत
आता ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाले आहे. जानेवारीत निवडणूकदेखील झाली. त्यानंतरच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा मांस, मच्छी, विक्रीवर बंदीचा निर्णय झाला आहे. एकमताने मंजूर झालेल्या ठरावाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली. त्याचे स्वागत संत तुकाराम महाराज देहू संस्थांनकडूनदेखील करण्यात आले आहे.