Ajit Pawar On James Laine : तुम्ही कारण नसताना कोणत्याही पावत्या माझ्या नावावर फाडू नका; जेम्स लेन प्रकरणावर अजित पवार नेमकं काय म्हणाले?

जेम्स लेनप्रकरणी (James Laine) मी कोणतेही वक्तव्य केले नाही. ज्यांनी त्याच्यासंदर्भातमध्ये मी काहीही बोलू शकत नाही. कारण नसताना कोणत्याही पावत्या माझ्या नावावर फाडू नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

Ajit Pawar On James Laine : तुम्ही कारण नसताना कोणत्याही पावत्या माझ्या नावावर फाडू नका; जेम्स लेन प्रकरणावर अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 10:49 AM

पुणे : जेम्स लेनप्रकरणी (James Laine) मी कोणतेही वक्तव्य केले नाही. ज्यांनी त्याच्यासंदर्भातमध्ये मी काहीही बोलू शकत नाही. कारण नसताना कोणत्याही पावत्या माझ्या नावावर फाडू नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. जेम्स लेन प्रकरणावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्याकडून मी कोणतीही चुकीची माहिती घेतली नाही, असे नुकताच जेम्स लेन म्हणाला होता. त्यावर अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली, तेव्हा ते बोलत होते. देशात सध्या इतर मुद्दे आहेत. त्यावर आपण चर्चा करू. हे जुने मुद्दे काढून कशा कुणाच्या भावना भडकतील, कुणामध्ये कशी संभ्रमावस्था निर्माण होईल, हे पाहण्याचे काम आपले नाही. माध्यमांनीही हे दाखवणे कमी करावे आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

दिल्लीतील घटनेचा निषेध

दिल्लीतील घटनेचा निषेध करत ते म्हणाले, की सर्व जातीधर्मात एकोपा राहावा, कोणत्याही धर्मात तेढ निर्माण होऊ नये, असा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. दिल्लीत झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले. इतर देशांची जसे श्रीलंका, पाकिस्तान यासारख्या देशात काय चालले आहे, याचा विचार करा. आपला मोठा देश एकोप्याने राहावा, याचा प्रयत्न सर्वांनी करावा, हे संविधानात सांगितले आहे. त्याचा अवलंब करावा, असे ते म्हणाले.

जयश्री जाधवांचे अभिनंदन

जाधव ताईंबरोबर आम्हाला एकसंघपणे काम करावे लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला. त्यांचे अभिनंदन करताना जनतेचेही अजित पवार यांनी आभार मानले. तसेच चंद्रकांत पाटील यांच्याविषयी बोलणे टाळले.

जेम्स लेन प्रकरणावर काय म्हणाले अजित पवार?

आणखी वाचा :

Kolhapur North By Election 2022 : चंद्रकांतदादांनी खरोखरच हिमालयात जावं, मीही सोबत येईल; जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

Kolhapur By Election Result 2022 : कोल्हापूर पोटनिवडणुकीत महात्मा गांधींची नोट चालली, पुण्यात राजू शेट्टींचा हल्लाबोल

Kashmir Files Actor : पुण्यात आशिष शेलारांना ‘फारुख मलिक बिट्टाची’ भीती; चिन्मय मांडलेकरला म्हणाले, …तर माझं काय होईल?

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.