Ajit Pawar | अजितदादा व्यासपीठावर, कार्यकर्त्याची घोषणाबाजी, दादा का म्हणाले, तुझी ग्रामपंचायत आली का?
अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेंच्या नुतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे.
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान,अजितदादा एका कार्यक्रमात (Ajit Pawar From Indapur Tour) भाषण देत असताना एका कार्यकर्त्याने घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. यावेळी दादा म्हणाले, “तुझी ग्रामपंचायत आली का?” (Ajit Pawar From Indapur Tour)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमचं इंदापूर (Indapur) तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेंच्या नुतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी इंदापूरचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) उपस्थित होते.
“तुझी ग्रामपंचायत आलीय का..?”
दादांच्या भाषणादरम्यान एकाने घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. यावेळी दादा म्हणाले “तुझी ग्रामपंचायत आलीय का..? आली असेल तर अभिनंदन, पण मी पाहिलंय ज्याची ग्रामपंचायत गेलीय तोच बेंबीच्या देठापासून घोषणा देतो”, असं म्हणत अजित पवारांनी मिश्किल टोला लगावला. अजित दादांच्या या मिश्किल टोल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
“भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..?”
अजित पवारांनी यावेळी बोलताना भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..? असा टोला हर्षवर्धन पाटील यांचं नाव न घेता लगावला. तर इंदापूरचा दूध संघ कधीच बंद पडला. तुम्हाला दूध संघ चालवता येत नाही. बँक चालवता येत नाही.काय चाललंय, असा सवाल अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना केला.
भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..?, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना टोलाhttps://t.co/6QpsMTEjYP#ajitpawar | #dattatraybharane | #ncp | #bjp | #harshwardhanpatil | @AjitPawarSpeaks | @bharanemamaNCP | @Harshvardhanji | @NCPspeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 6, 2021
Ajit Pawar From Indapur Tour
संबंधित बातम्या :
Raj Thackeray | राज ठाकरेंची वाशी कोर्टात हजेरी, 9 नंबरच्या कारने ‘कृष्णकुंज’हून रवाना
अजित पवार इंदापूर दौऱ्यावर, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून 101 किलोंचा तिरंगा हार