Pune bouncer issue : …तर शाळेची मान्यता रद्द करणार; शिक्षण उपसंचालकांनी दिला इशारा

जर अनधिकृतपणे (Illegal) बाऊन्सर (Bouncer) नेमले असतील तर त्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल, अशी प्रतिक्रिया शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे (Audumbar Ukirde) यांनी tv9 शी बोलताना दिली आहे.

Pune bouncer issue : ...तर शाळेची मान्यता रद्द करणार; शिक्षण उपसंचालकांनी दिला इशारा
शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडेImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 5:45 PM

पुणे : युरो शाळेत जर अनधिकृतपणे (Illegal) बाऊन्सर (Bouncer) नेमले असतील तर त्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल, अशी प्रतिक्रिया शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे (Audumbar Ukirde) यांनी tv9 शी बोलताना दिली आहे. अनेक पालकांनी शाळेची फी भरलेली नाही, त्यामुळे शाळेने मुलांचे दाखले मेलने पाठवून दिल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मीच आज पालकांना शाळेत जायला सांगितले होते. पण त्यानंतर त्याठिकाणी धक्काबुक्की झाल्याचे पालकांनी सांगितले आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही उकिरडे म्हणाले आहेत. शालेय शुल्काबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या, त्या विद्यार्थ्यांना शाळेने मेलद्वारे टीसी पाठवले. शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेला. तर प्रवेशावेळी पालकांना बाऊन्सरकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला, त्यावर उकिरडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय घडलं होतं?

उंड्री येथील युरो शाळेत ही पुन्हा बाऊन्सरकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आली. शालेय शुल्काबाबतचा हा वाद आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या त्यावेळी सूचना दिल्या होत्या. या प्रकारामुळे शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला शाळेकडून केराची टोपली दाखवली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. आता शिक्षणमंत्री अशा मुजोर शाळांवर कारवाई करणार असल्याचे म्हणत आहेत. या प्रकारानंतर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शिक्षण उपसंचालक उकिरडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधी अश्विनी सातव डोके यांनी केलेली ही बातचीत –

बिबवेवाडीतही घडला होता प्रकार

येथील एका शाळेत बाऊन्सरने पालकाला मारहाण केलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये शाळेत निवदेन घेऊन गेलेल्या पालकाला तेथे उपस्थित असलेल्या बाऊन्सरने  मारहाण केली होती. पालकाने गैरवर्तन केल्याचा आरोप करत बाऊन्सरने ही मारहाण केली, काठीने चोप देत पालकाला पायऱ्यांवरून खाली ढकलून दिले. या घटनेचा सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मयूर गायकवाड वय (49 वर्षे) या पालकास मारहाण झाली होती.

आणखी वाचा :

Pune water problem : पाण्याच्या समस्येनं आंबेगाव पठारचे नागरिक हैराण, क्षेत्रीय कार्यालयावर रासपनं काढला हंडा मोर्चा

Pune IPL betting : आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, एकाचा शोध सुरू

कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदी केशरबाई पवार तर उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर बिनविरोध

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.