Lonavala tourism : पर्यटकांना हुसकावून लावतायत पोलीस; बंदी असतानाही लोक लोणावळ्यात वर्षाविहारासाठी करतायत गर्दी

जिल्हाधिकाऱ्यांनी (Pune collector) दिलेल्या आदेशानुसार उद्या म्हणजेच रविवारपर्यंत (17 जुलै) आणि जिल्हाधिकाऱ्यांचा पुढचा आदेश येईपर्यंत ही पर्यटन स्थळांवरची बंदी कायम असणार आहे.

Lonavala tourism : पर्यटकांना हुसकावून लावतायत पोलीस; बंदी असतानाही लोक लोणावळ्यात वर्षाविहारासाठी करतायत गर्दी
भुशी डॅम परिसरातून पर्यटकांना हुसकावून लावताना पोलीसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 2:52 PM

लोणावळा, पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात पर्यटन (Lonavala tourism) बंदी असतानादेखील अनेक पर्यटक वर्षविहार करताना पाहायला मिळत आहेत. 17 जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर बंदी असताना देखील ही बंदी झुगारून पर्यटक चोरीच्या मार्गाने भुशी डॅम (Bhushi dam) परिसरात दाखल होत आहेत. Tv9ची टीम याठिकाणी दाखल होताच लोणावळा पोलिसांना जाग आली आहे. आता पोलिसांकडून भुशी धरण परिसर निर्मनुष्य करण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटकांना पोलीस हुसकावून लावत असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी (Pune collector) दिलेल्या आदेशानुसार उद्या म्हणजेच रविवारपर्यंत (17 जुलै) आणि जिल्हाधिकाऱ्यांचा पुढचा आदेश येईपर्यंत ही पर्यटन स्थळांवरची बंदी कायम असणार आहे. यानुसार लोणावळा पोलिसांकडून लोणावळ्यातील पर्यटन स्थळांवर जाणारे मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत.

दरड कोसळून वाहतूक ठप्प

सततच्या पावसामुळे पानशेत रस्त्यावर ओसाडे आणि सोनपूर गावच्या सीमेवर, डोंगर उतारावर असलेली संरक्षक भिंत आणि दरड कोसळून सकाळी वाहतूक ठप्प झाली होती. घटना घडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. अवैध बांधकामांमुळे रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्यावर दरड पडल्याने वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील आठ-दहा दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला.

हे सुद्धा वाचा

जोर ओसरणार

सध्या पुणे शहर आणि परिसरात एक-दोन दिवसात पाऊस काहीशी उघडीप घेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दोनच दिवसांपूर्वी मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर आता कमी होत चालला आहे. अनेक ठिकाणी पावसाने काहीशी उघडीप दिल्याचे चित्र आहे. पुढील तीन दिवस आकाश सामान्‍यतः ढगाळ आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, पर्यटन स्थळे बंद असली तरी स्थानिक नागरिक आणि हॉटेलमधील बुकिंग पाहूनच पोलीस पर्यटन स्थळांकडे पर्यटकांना सोडत आहेत.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...