Devendra Fadnavis Video : बैल जोडीनं येतो आणि नांगरासकट येतो, फडणवीसांचा इशारा नेमका कुणाला?
हा उत्साह पाहून मनापासून आनंद झाला, एका मित्राने विचारलं भाऊ हा ड्रेस कसा घातला, जसं बैलगाडा शर्यतीसाठी बैलना सजवल जातं तसं मला हा ड्रेस महेश लांडगे यांनी दिला, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
पुणे : बैल कधी एकटा येत नाही तो जोडीनं येतो आणि नांगरासकट येतो. हा डायलॉग आपण आजपर्यंत फक्त मुळशी पॅटर्न (Mulshi Pattern) या चित्रपटात ऐकला असेल. मात्र हाच डायलॉग आज पिंपरी-चिंचवडमधून विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मारला आहे. यावेळी अशा प्रकरची डालॉगबाजी करत फडणवीसांनी तुफान बॅटिंग केली. तसेच विरोधकांना कडकडीत इशाराही दिली. आज पिंपरी चिंचवडमधील बैलगाडा शर्यतीला (Bull Cart Race) फडणवीसांनी हजेरी लावली होती. यावेळी फडणवीस एका वेगळ्याच पोशाखात दिसून आले. त्यांनी या पोषाखाचीही स्टोरी सांगतली आहे. हा उत्साह पाहून मनापासून आनंद झाला, एका मित्राने विचारलं भाऊ हा ड्रेस कसा घातला, जसं बैलगाडा शर्यतीसाठी बैलना सजवल जातं तसं मला हा ड्रेस महेश लांडगे यांनी दिला, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
फडणवीसांची जोरदार डायलॉगबाजी
फडणवीसांची जोरदार डायलॉगबाजी
तसेच फडणवीसांनी यावेळी मुळशी पॅटर्न चित्रपटाचा डायलॉगही मारला. मुळशी पटर्न मधील डायलॉग आठवला, बैल कधी एकटा एक नाय जोडीनं येतो, आणि नांगरासकर येतो. हा नांगर बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांसाठी असेल असा टोला यावेळी फडणवीसांनी लगावला आहे. तर बैलगाडा शर्यत सुरू झाली हे महेश लांडगे यांचं श्रेय आहे. अनेकदा बंदी उठली परत बंदी आली, त्यामुळे अनेकदा कोर्टाने बंदी देखील घातली,सर्वांच न्यायालयाला सांगितले बैल पळणार प्राणी आहे आणि शर्यत सुरू झाली. बैलगाडा शर्यत बंद झाल्याने अनेकांचे नुकसान झाले मात्र आता ते शक्य नाही ,आता काही झालं तरी पुन्हा बंद होऊ देणार नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
महेश लांडगे काय म्हणाले?
तर महेश लांडगे यांनीही यावेळी फडणवीसांचं भरभरून कौतुक केले आहे. सर्व राज्यात जी बैलगाडा शर्यत सुरू झाली ती फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाली. 2017 पर्यंत कुठल्याच सरकार ने मुख्यमंत्र्यांनी खर्च केला नाही. आम्ही एक एक रुपये गोळा करून केस लढत होतो, पण आमच्याकडे फी एवढे पैसे नव्हते,पेटाकडे मोठे नेते होते. मात्र आम्ही हार नाही मानली,या बैलगाडा शर्यतीसाठी जी कायदेशीर लढाई होती त्याचा खर्च देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केला. आधी सुप्रीम कोर्टा बाहेर उपाशी थांबलो ,पण कुणी मदत केली नाही, असेही ते म्हणाले, तसेच बोलताना जर कुणाच्या मनाला लागले असलं तर माफी मागतो, असे म्हणत त्यांनी उपस्थितांची माफीही मागितली.