AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांचं सत्यजित तांबे यांच्याबद्दल मोठं विधान, नाशिकमध्ये राजकीय भूकंप घडवणं हीच भाजपची खेळी?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्याबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं सत्यजित तांबे यांच्याबद्दल मोठं विधान, नाशिकमध्ये राजकीय भूकंप घडवणं हीच भाजपची खेळी?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 8:07 PM

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्याबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. “सत्यजित तांबे यांच्याबद्दल आमचं नेमकं धोरण काल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ. सत्यजित तांबे एक व्यक्ती म्हणून, युवा नेता म्हणून निश्चितपणे त्यांचं काम चांगलं आहे. पण शेवटी सगळे राजकीय निर्णय धोरणांप्रमाणे योग्यवेळी करावे लागतात. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच सांगितलं आहे. ते याबद्दल योग्य निर्णय घेतील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांचं काम चांगलं असल्याचा उल्लेख केल्याने नाशिकमधील राजकीय भूकंप घडवणं ही भाजपची खेळी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतोय.

देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एका कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना पत्रकारांनी सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणे हे तुमचं धक्कातंत्र आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

‘असं कुठलंही गणित आम्ही घडवलेलं नाही’

“असं कुठलंही गणित आम्ही घडवलेलं नाही. मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला जरुर गेलो होतो. पण त्या कार्यक्रमाला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातही होते आणि इतर विविध पक्षांचेदेखील नेते होते. याशिवाय आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातच असतो ना? राजकारणात एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणं हे काही नवीन नाहीय”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“आता जो काही घटनाक्रम झाला तो वाटतो तसा नाही. योग्यवेळी सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील. त्याची वाट बघा”, असं सूचक विधान यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

“आम्ही नाशिकमध्ये उमेदवार देणं टाळलेलं नाही. शेवटी आम्हीदेखील त्या ठिकाणी उमेदवार देण्याच्या प्रयत्नात होतो. आमची मनापासून इच्छा होती की राजेंद्र विखे यांनी त्याठिकाणी अर्ज दाखल करावा. आमचे त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरु होते. पण काही कारणास्तव त्यांनी असमर्थता दाखवली. अन्यथा आम्ही त्यांना उमेदवारी देणार होतो”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळीची चर्चा

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कुशलपणे राजकीय खेळी खेळल्याची चर्चा आहे. एकीकडे काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. त्यांनी आपला मुलगा सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे भाजपने उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे काँग्रेसकडून तांबे पिता-पुत्रांवर कारवाई केली जाणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. याशिवाय या घडामोडींमुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि तांबे यांच्या कुटुंबात गृहकलह सुरु असल्याची चर्चा आहे.

सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटून आपल्याला पाठिंबा द्यावा, यासाठी विनंती करणार असल्याचं विधान केलंय. या दरम्यान सत्यजित यांना काँग्रेसने पाठिंबा दिला नाही आणि भाजपने पाठिंबा दिला तर तांबे कायमचे भाजपचे होऊ शकतात. त्यामुळे ही देवेंद्र फडणवीस यांची अतिशय नियोजनबद्ध राजकीय खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.